अजितदादांच्या प्रचार सभा होऊ देणार नाही, छावा संघटना आक्रमक, सूरज चव्हाणांच्या निवडीला विरोध


लातूर : अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदी सूरज चव्हाण यांच्या निवड करण्यात आली आहे. या निवडीवरुन छावा संघटना (Chhaava sanghtana) आक्रमक झाली आहे. सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्या निवडीला विरोध करीत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात होणाऱ्या अजितदादा पवार यांच्या प्रचारसभेत शेतकऱ्यांना सोबत घेऊन विरोध दर्शवण्याचा इशारा विजयकुमार घाडगे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण

काही महिन्यांपूर्वी लातुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली होती. त्यावेळी याप्रकरणावरून सूरज चव्हाण यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन करुन आता त्यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीवरूनच छावा संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पक्षाच्या 17 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पक्षाची भूमिका मांडण्यासाठी 17 जणांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना प्रवक्तेपदासाठी संधी देण्यात आली आहे. याबाबतचं पत्रक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढलं आहे.

राष्ट्रवादीने जाहीर केलेले 17 प्रवक्ते कोण?

1) रुपाली चाकणकर
२) ब्रिजमोहन श्रीवास्तव
3) चेतन तुपे
4) आनंद परांजपे
5) अविनाश आदिक
६) सना मलिक
7) राजलक्ष्मी भोसले
8) सुरज चव्हाण
9) हेमलता पाटील
10) प्रतिभा शिंदे
11) विकास पासलकर
12) राजीव साबळे
13) प्रशांत पवार
14) श्याम सनेर
15) सायली दळवी
16) शशिकांत लहरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामाला लागला

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामाला लागला आहे. अजित पवारांनी जिथे फायदा होईल, तिथे मित्र पक्षांसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याचं अनेकदा वरिष्ठ नेतेमंडळींकडून बोललं जातं. त्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी तिन्ही पक्षांची युती कोणत्या तालुक्यात टिकणार? याकडे पाहाणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

रुपाली चाकणकर, सूरज चव्हाण आणि निर्मला नवले यांचा रोड शो, दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास कार्यक्रमांचं आयोजन

आणखी वाचा

Comments are closed.