Chhatrapti Sambhaji Nagar News – वडोद बाजार पोलिसांनी घडवले माणुसकीचे दर्शन

छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलिसांनी शेतकऱ्याची मदत करून माणुसकीचे दर्शन दिले आहे. ट्रॅक्टरमधून रस्त्यावर पडलेला मका गोळा करून पुन्हा ट्रॅक्टरमध्ये भरण्यास वडोद बाजार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी शेतकऱ्याला मदत केली. पोलिसांच्या या कार्याची चर्चा परिसरात दिवसभर सुरु होती.

छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर पाथरी गावाजवळ एक शेतकरी ट्रॅक्टरमधून शेतातील मका घेऊन जात होता. रस्त्यावर खड्डा असल्याने ट्रॅक्टरचे चाक त्यात गेले आणि ट्रॉलीला बांधलेला पट्टा निसटला. त्यामुळे ट्रॉलीमधील मका रस्त्यावर पडला. शेतकरी एकटाच मका गोळा करीत होता. याचदरम्यान तेथून पेट्रोलिंगसाठी जात असलेल्या वडोद बाजार पोलिसांनी शेतकऱ्याची धडपड पाहिली व त्यांनी शेतकऱ्याला मदत केली.

पोलिसांनी रस्त्यावर पडलेला सर्व मका उचलून ट्रॅक्टरमध्ये टाकला. यावेळी वदोड बाजार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस हवालदार पटेल, तेलगोटे, पोलीस अंमलदार दराडे आणि मैंद आदींनी मदत केली.

Comments are closed.