राहुल द्रविडच्या मुलाची भारतीय संघात धडाकेबाज एन्ट्री, अफगाणिस्तानविरुद्ध करणार चमकदार कामगिरी?
पूर्व भारतीय कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा मुलगाही आता भारतासाठी खेळायला सज्ज झाला आहे. द्रविड यांचा धाकटा मुलगा अन्वय द्रविडने (Anvay Dravid) आता भारताच्या स्तरापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.
बीसीसीआयने भारत अंडर-19च्या दोन संघांची निवड केली असून, हे दोन्ही संघ अफगाणिस्तानच्या ज्युनियर टीमसोबत ट्राय सिरीज खेळणार आहेत. या मालिकेसाठी अंडर-19 ए आणि बी टीमची घोषणा करण्यात आली आहे.
या संघांपैकी बी टीममध्ये विकेटकीपर-फलंदाज म्हणून अन्वय द्रविडची निवड झाली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता ज्युनियर द्रविडकडे लागले आहे.
कर्नाटक अंडर-19 संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करून अन्वय द्रविडने स्वतःला एक तरुण आणि प्रतिभावान विकेटकीपर-फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे.
वडिलांमुळे अन्वयवर नेहमीच चाहत्यांचे लक्ष राहिले, पण आता भारताच्या अंडर-19 संघात स्थान मिळाल्याने तो चर्चेत आला आहे.
या ट्राय सिरीजमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवून अन्वय भारताच्या मुख्य अंडर-19 संघात स्थान मिळवू शकतो. सध्या अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ तयारी करत आहे. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे (Vaibhav Suryavanshi & Ayush Mhatre) सध्या उच्च स्तरावर खेळत असल्याने ते या संघात नाहीत.
भारत अंडर-19 अ संघ: विहान मल्होत्रा (कर्णधार), अभिज्ञान कुंडू (कर्णधार आणि यष्टिरक्षक), वाफी कच्छी, वंश आचार्य, विनीत व्हीके, लक्ष्य रैचंदानी, ए. रापोल (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, अनमोलजीत सिंग, महंमद पटेल, अनमोलजीत सिंह, अनमोलजीत सिंह, महंमद पटेल रावत, मोहम्मद मलिक.
Comments are closed.