Mumbai News – एक्स बॉयफ्रेडच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन, घाटकोपरमधील धक्कादायक घटना

एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून घाटकोपरमध्ये एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अली शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घाटकोपरमधील इंदिरानगरमध्ये राहणारी 22 वर्षीय पीडिता आणि आरोपी अली शेख एकाच कंपनीत काम करत होते. तेथेच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र दोघांचा धर्म वेगळा असल्याने पीडितेच्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. पाच महिन्यांपूर्वी अलीचे ऑफिसमधील दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे पीडितेला कळले. यावरून दोघांमध्ये भांडण होत होते.

नवरात्रीपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर पीडितेने ती नोकरी सोडली आणि दुसऱ्या कंपनीत कामाला लागली. मात्र अली तेथे येऊन तिला त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून पीडितेने आत्महत्या केली. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अलीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Comments are closed.