वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा बदल; 2027 पासून सर्व 12 संघांना संधी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. 2027 पासून सुरू होणाऱ्या नव्या चक्रात सर्व 12 टेस्ट खेळणाऱ्या देशांचा समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र, ही स्पर्धा सिंगल-टियर स्वरूपातच राहणार आहे. गेल्या एका वर्षापासून ICC आणि विविध क्रिकेट बोर्डांमध्ये टू-टियर सिस्टीम आणि प्रमोशन-रिलेगेशन मॉडेलवर चर्चा सुरू होती, पण अलीकडे झालेल्या ICC च्या तिमाही बैठकीत हा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला. कारण – फंडिंग मॉडेलची अस्पष्टता आणि छोट्या संघांना टॉप टीमविरुद्ध कमी सामने मिळण्याची चिंता.

या विषयावर न्यूझीलंडचे माजी क्रिकेटर रोजर टूज यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सविस्तर समीक्षा केली होती. पण ‘बिग थ्री’ – भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया – यांच्या विरोधामुळे प्रमोशन-रिलेगेशन मॉडेल मंजूर होऊ शकले नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ रिचर्ड थॉम्पसन यांनी स्पष्ट सांगितले की, “जर आमची टीम कमकुवत फॉर्ममध्ये गेली तर आम्ही डिव्हिजन-2 मध्ये जाणार आणि भारत-ऑस्ट्रेलियाशी खेळ गमावणार? हे शक्य नाही.” अशा वक्तव्यांमुळे या मॉडेलचा विचार थांबवण्यात आला.

आता WTC मध्ये सर्व 12 संघांना निश्चित टेस्ट सामन्यांची संधी दिली जाईल. तथापि, सामने होस्ट करण्यासाठी अतिरिक्त निधी मिळणार नाही. या निर्णयामुळे अफगाणिस्तान आणि आयरलंड सारख्या नव्या संघांना अधिक सामन्यांचे संधी मिळतील, जे टेस्ट क्रिकेटच्या विकासासाठी सकारात्मक ठरेल. दरम्यान, ICC ODI सुपर लीग पुन्हा सुरू करण्याचाही विचार करत आहे. 2023 वर्ल्ड कपनंतर ती थांबवण्यात आली होती, पण पुढील चक्रात ती परत येऊ शकते. या पावलाने वनडे फॉरमॅटला पुन्हा स्थिर रचना आणि आवश्यक प्रासंगिकता मिळेल, असा ICC चा विश्वास आहे.

Comments are closed.