Narendra Modi : भूतान दौऱ्यावरून परतल्यावर मोदींनी स्फोटातील जखमींची घेतली भेट
नवी दिल्ली : लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट नं. 1 जवळ एका कारमध्ये 10 नोव्हेंबर रोजी बॉम्बस्फोट झाला आणि दिल्ली हादरली. या स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. मात्र स्फोट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (11 नोव्हेंबर) पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेले. त्यामुळे विरोधकांनी मोदींवर टीका केली होती. मात्र आता भूतान दौऱ्यावरून पतरल्यानंतर मोदींनी लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात जाऊन स्फोटामध्ये जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेतली आहे.
Comments are closed.