पहिल्या कसोटीआधी अचानक नितीश कुमार रेड्डी संघाबाहेर; कोलकातामध्ये नेमकं काय घडलं? BCCI ने सांगू


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिली कसोटी: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका शुक्रवारपासून सुरू होणार आहे. पहिला सामना कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स (IND vs SA 1st Test Update) मैदानावर खेळला जाईल. या सामन्याच्या आधी भारतीय संघातील वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू नीतीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) याला संघातून मुक्त करण्यात आले आहे. याची पुष्टी बीसीसीआयने बुधवारी केली. रेड्डीला गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कसोटी संघातून रिलीज करण्यात आले आहे. तो आता राजकोटमध्ये भारत ‘अ’ संघात सहभागी होईल. ही वनडे मालिका 19 नोव्हेंबरला संपेल.

बीसीसीआयने आपल्या निवेदनात काय म्हटले?

“ऑलराउंडर नीतीश कुमार रेड्डीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघातून रिलीज करण्यात आले आहे. तो आता राजकोटमध्ये दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध खेळणाऱ्या भारत ‘अ’ संघाशी जोडला जाईल. वनडे मालिका संपल्यानंतर तो दुसऱ्या कसोटीकरिता पुन्हा भारतीय संघात सामील होईल.” असे बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले. दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

दरम्यान, रेड्डीला कसोटी संघात स्थान न मिळण्याची शक्यता आधीपासूनच होती, कारण ऋषभ पंत याची यष्टिरक्षक-बल्लेबाज म्हणून पुनरागमन होणार आहे आणि ध्रुव जुरेल याला फलंदाज म्हणून कायम ठेवले जाईल.

पहिल्या कसोटीसाठी भारताचा अपडेट संघ : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ अपडेट संघ : टिळक वर्मा (कर्ंधर), ऋतुराज गायकवाड (उक्करंधर), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन (यष्टिरक्षक), आयुष बडोनी, निशांत सिंधू, विपराज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिध्द कृष्णा, खलील सिंग अहमद, निशांत कुमार रेड्डी, निशांत सिंधू.

हे ही वाचा –

Rohit Sharma-Virat Kohli : मी खेळणार… रोहित शर्माची घोषणा! पण BCCI च्या सूचनेनंतरही विराट कोहली लंडन सोडायला तयार नाही? अहवालात खुलासा

आणखी वाचा

Comments are closed.