इस्लामाबादमधील स्फोटानंतर श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तान सोडले, सुरक्षेचे आश्वासन देऊनही लंकन खेळाडू मायदेशी

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील आत्मघाती हल्ल्यानंतर श्रीलंकन क्रिकेट संघाने तातडीने आपला पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, संघातील अर्ध्याहून अधिक खेळाडू मायदेशी रवाना झाले असून उर्वरित सदस्यांना परतीच्या प्रवासासाठी सुरक्षा कवच देण्यात आले आहे.

बुधवारी सकाळीच लंकन संघाच्या सुरक्षेत अधिक कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी स्वतः श्रीलंकन खेळाडू व अधिकाऱ्यांची भेट घेऊन पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले, मात्र श्रीलंकेचे खेळाडू हल्ल्यानंतर मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ असल्याने त्यांनी दौरा थांबवण्याचा निर्णय कायम ठेवला.

श्रीलंकेचा संघ पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेसाठी दौऱयावर आला होता. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 6 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. मालिकेतील दुसरा सामना 13 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार होता. मात्र आजच्या हल्ल्यानंतर लंकेने उद्या होणारा सामना सोडून दिला.

तीन वर्षांपूर्वी न्यूझीलंडचाही जप्ती रद्द

2021 मध्ये सुरक्षेच्या कारणावरून न्यूझीलंडनेही पाकिस्तानविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका रद्द केली होती. त्यावेळी संघाने एकही सामना न खेळता मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. मार्च 2009 मध्ये गद्दाफी स्टेडियमजवळ टीटीपी दहशतवाद्यांनी श्रीलंकेच्या संघाच्या बसवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात कोणी ठार झाले नव्हते, पण काही खेळाडू जखमी झाले होते. त्या घटनेनंतर बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पाकिस्तानची दारे बंद करण्यात आली होती.

Comments are closed.