खोपोलीची स्वागत कमान मोजतेय अखेरची घटका; अपघाताचा धोका, लाद्या निखळल्या, झाडाझुडपांचा वेढा

पंधरा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली खोपोलीची स्वागत कमान धोकादायक झाली असून ही कमान अखेरची घटका मोजत आहे. कमानीला झाडाझुडपांनी वेढा घातला आहे. कमानीवर बसवलेल्या लाद्या आणि शोभेच्या वस्तू खिळखिळ्या झाल्या असून त्या कधीही कोसळतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
२५ लाख रुपये खर्च करून १५ वर्षांपूर्वी खोपोली नगरीच्या वेशीवर २ स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. खोपोलीत स्वागत 000 करणाऱ्या कमानीचे काम निकृष्ट करण्यात आले होते. याविरोधात अनेकदा आवाज उठवून नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या. तसेच जीवितास धोकादायक ठरणाऱ्या कमानी सुस्थितीत कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
पुनरावृत्ती नका !
स्वागत कमान मधोमध वाकली असून कमानीवर गवत व झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. तर सुशोभीकरणाचे साहित्य खिळखिळीत झाले असल्याने कोणत्याही क्षणी ती कोसळण्याच्या स्थितीत आहे. स्वागत कमान किंवा त्याचे अवशेष कोसळून एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल संतप्त नागरिकांनी विचारला आहे. २०२२ रोजी सकाळी कमानीच्या २ भल्यामोठ्या लाद्या रस्त्यावर कोसळल्या होत्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र या घटनेची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, अशी मागणी खोपोलीकरांनी केली आहे.

Comments are closed.