Acidity : सतत ऍसिडीटी? लाइफस्टाईलमध्ये करा हा बदल
हल्ली बऱ्याचजणांना ऍसिडीटीचा त्रास होतो. तज्ज्ञांच्या मते ऍसिडीटीचा त्रास होण्यामागे चुकीची लाईफस्टाईल हे मुख्य कारण आहे. करियर, स्पर्धा आणि ऑफिस स्ट्रेस यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. वेळेवर जेवण नाही, स्ट्रेस, अपुरी झोप यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होत आहे. या सर्व गोष्टींमुळे ऍसिडीटीचा त्रास सुरू होतो. अशा वेळी लाईफस्टाईलमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असते. निरोगी आरोग्य फक्त चांगल्या आहारावरच नाही जेवणाच्या- झोपण्याच्या वेळेवरही अवलंबून आहे.
अनियमित जेवण, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात आम्ल Acid तयार होते. हे आम्ल अन्ननलिकेत गेल्यावर छातीत जळजळ, ढेकर, उलट्या, पोटदुखीचा त्रास सूरु होतो. त्यात ऑफिसमध्ये डेस्क जॉब असल्यावर शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळे पचनशक्ती मंदावते आणि ऍसिडीटी वाढते. त्यामुळे जाणून घेऊयात ऍसिडीटीपासून दूर राहण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे.
काय करावे?
- दररोज वेळेवर आणि पौष्टिक जेवण जेवावे.
- रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी झोपावे.
हेही वाचा – Winter Indoor Workout Ideas: कडाक्याच्या थंडीत व्यायामाचा कंटाळा येतो? जाणून घ्या काही इनडोअर वर्कआऊट
- दररोज सकाळी किमान 15 ते 20 मिनिटे व्यायाम करावा.
- व्यायाम शक्य नसल्यास चालावे.
- योग, मेडिटेशन करावे.
काय टाळावे?
- दररोज वेळेवर आणि पौष्टिक जेवण जेवावे.
- रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी झोपावे.
- दररोज सकाळी किमान 15 ते 20 मिनिटे व्यायाम करावा.
- व्यायाम शक्य नसल्यास चालावे.
- योग, मेडिटेशन करावे.
हेही वाचा – Saffron : स्वादासाठीच नाही आरोग्यासाठीही फायदेशीर आहे केशर
Comments are closed.