मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक निकाल जाहीर! जितेंद्र आव्हाड उपाध्यक्षपदी विजयी, अजिंक्य नाईक पॅनलचा दबदबा
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांच्या पॅनलने मोठा विजय मिळवला आहे. उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांनी 48 मतांनी विजय मिळवत नवीन शेट्टी यांचा पराभव केला.
सचिव पदासाठी उन्मेष खानविलकर यांनी 227 मतांसह विजय मिळवला तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शाह आलम शेख यांना 129 मते मिळाली. संयुक्त सचिव पदावर निलेश भोसले यांनी 228 मतांनी गौरव पय्याडे यांचा पराभव करत यश मिळवलं. खजिनदार पदावर अरमान मलिक यांनी 237 मतांनी विजय मिळवत सुरेंद्र शेवाळे यांना मागे टाकलं.
मुंबई टी20 गव्हर्निंग कौन्सिलसाठी भरत किणी विजयी ठरले असून त्यांनी किशोर जैन यांचा पराभव केला.
ॲपेक्स कौन्सिलमध्ये नऊ विजयी उमेदवारांची निवड झाली आहे:
कदम विघ्नेश – 242 मते
नदीम मेमन – 198 मते
मिलिंद नार्वेकर – 242 मते
भूषण पाटील – 208 मते
विकास रेपाळे – 185 मते
सूरज समत – 246 मते
सावंत नील – 178 मते
संदीप विचारे – 247 मते
प्रमोद यादव – 186 मते
या आधीच अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली होती. मात्र कार्यकारिणीसाठी झालेल्या निवडणुकीत शरद पवार आणि आशीष शेलार गटात तणाव निर्माण झाल्याने मतदानाची वेळ आली. शेवटी निकालात अजिंक्य नाईक गटाचे 12 सदस्य विजयी ठरले, तर शेलार गटाचे चार सदस्यांनी विजय मिळवला.
विजयानंतर अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “हा विजय आमच्या मैदान क्लब्स, सचिव, तसेच प्रत्येक महिला व पुरुष क्रिकेटपटूंच्या अथक प्रयत्नांचा परिणाम आहे. हा संपूर्ण मुंबई क्रिकेट परिवाराचा विजय आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या पाठिंब्यामुळे हा प्रवास शक्य झाला, तसेच आशीष शेलार यांच्या मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार.”
एकूण 362 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला असून, या निवडणुकीत मुंबई क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र आहे.
Comments are closed.