Winter Skincare: थंडीत काचेसारखा चमकेल निस्तेज चेहरा; करा हे नैसर्गिक उपाय

हिवाळ्यात त्वचेच्या समस्या जास्त प्रमाणात होतात. अनेक महिला या फाटलेले ओठ, निस्तेज, कोरड्या त्वचेमुळे हैराण होतात. यामुळे या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी काही घरगुती प्रभावी उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण बाजारातील उत्पादनांमध्ये केमिकल असण्याची शक्यता असते. अशा वेळी केमिकल फ्री उपाय हे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी, निस्तेज दिसत असेल तर हे उपाय नक्की करून पहा.. ( Natural remedies for glowing skin in winter )

साजूक तूप आणि पाणी
दररोज कोमट पाण्यात एक चमचा साजूक तूप घालून प्यावं. यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळतं, ज्यामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा मऊ राहते. साजूक तुपामुळे पदार्थाला चव तर येतेच शिवाय ते आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असतं.

आवळा
हिवाळ्यात दररोज एक आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते. आवळा हा व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे, त्यामुळे या दिवसात आवळा हा आहारात समाविष्ट करावा.

खजूर, मनुका आणि फळे
हिवाळ्यात खजूर, मनुका आणि हंगामी फळे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तुम्ही खजूर आणि मनुका दुधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी खाऊ शकता.

तेल मालिश
हिवाळ्यात आंघोळ करण्यापूर्वी शरीरावर तीळ किंवा बदाम तेलाने मालिश केल्याने ओलावा टिकतो. त्यामुळे रक्ताभिसरण देखील सुधारते. तेलाने शरीराची मालिश करण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे.

गरम पाण्याने आंघोळ टाळा
हिवाळ्यात अनेकांना गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते, पण ते त्वचेसाठी चांगले नसते. यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाते. त्यामुळे हिवाळ्यात नेहमी कोमट पाण्याने आंघोळ करावी. कोमट पाण्यामुळे त्वचेला हानी पोहोचत नाही.

Comments are closed.