3 फिरकीपटू, 2 गोलंदाज… अक्षर पटेल OUT; कोलकाता कसोटीसाठी कशी असेल टीम इंडियाची Playing XI


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 1ली कसोटी अपडेट: दक्षिण आफ्रिका संघाचा भारत दौरा कसोटी मालिकेपासून सुरू होत आहे. पहिला सामना शुक्रवार 14 नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 काही बदल पाहायला मिळू शकतात.

पंत परतणार मैदानात

इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाल्यानंतर ऋषभ पंत आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. जवळपास तीन महिन्यांनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. सहायक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी सांगितले की, पंत आणि ध्रुव जुरेल दोघेही एकत्र खेळू शकतात. जुरेलचा खेळ निश्चित मानला जात आहे.

अक्षर पटेल अन् नितीश रेड्डी बाहेर

या सामन्यात अक्षर पटेलला बाहेर बसावे लागू शकते. तर नितीश कुमार रेड्डीला पहिल्या कसोटीसाठी संघातून रिलीज करण्यात आले आहे. बीसीसीआयने सांगितले की, “नितीश राजकोटमध्ये दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळेल आणि मालिकेनंतर दुसऱ्या कसोटीसाठी पुन्हा भारतीय संघात सामील होईल.” नितीशला दुखापत नाही, पण प्लेइंग 11 मध्ये त्याला स्थान मिळण्याची शक्यता नव्हती म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

टीम इंडियाचे संभाव्य संयोजन

कोलकाता कसोटीत भारत तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांसह उतरू शकतो. टीम इंडियाच्या प्लेइंग-11 संघात रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव हे तीन फिरकीपटूंचा समावेश असू शकतो. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे दोन वेगवान गोलंदाज असतील. भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध दोन शतके झळकावणारा ध्रुव जुरेल या आठवड्यात खेळेल.

यष्टिरक्षक कोण आहे?

ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत दोघेही संघात असतील, पण विकेटकीपिंगची जबाबदारी पंतकडे असण्याची दाट शक्यता आहे. कारण जर तो पूर्णपणे फिट नसता, तर व्यवस्थापन त्याला त्वरित मैदानात उतरवले नसते.

सामना कुठे पाहता येईल? (India vs South Africa 1st Test live streaming)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केली जाईल. तसेच जिओ सिनेमा (JioCinema) आणि डिस्नी+ हॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइटवरही थेट स्ट्रीमिंग पाहता येईल.

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11

  • फलंदाज : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल.
  • फिरकीपटू : रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव.
  • गोलदांज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
  • यष्टीरक्षक : ऋषभ पंत.

आणखी वाचा

Comments are closed.