अभियंत्याला चापट मारणे माजी आमदाराला भोवले, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आद


गीता जैन: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला सार्वजनिक ठिकाणी चापट मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या प्रकरणात माजी आमदार गीता जैन (Geeta Jain) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने (Court) दिले आहेत. आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने हा आदेश दिला असून, काशीमिरा पोलिसांना भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 352, 353, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Geeta Jain: 2023 मधील व्हायरल व्हिडिओची पार्श्वभूमी

हा व्हिडिओ वर्ष 2023 मध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्या वेळी मिरा-भाईंदरच्या आमदार असलेल्या गीता जैन या महानगरपालिकेच्या दोन अभियंत्यांवर संताप व्यक्त करताना दिसतात. व्हिडिओमध्ये त्या कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांना चापट मारताना आणि त्याचा कॉलर धरून आरडाओरड करताना दिसतात. ही घटना 16 जून 2023 रोजी मिरा रोड परिसरातील पेणकर येथील कक्कड इमारतीलगतच्या झोपडपट्टी भागात घडली होती. त्या वेळी मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून एका घरावरील तोडक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत घर उद्ध्वस्त झाल्याने तेथील रहिवासी, महिला आणि लहान मुले पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यावर आले होते.

Geeta Jain: घटनास्थळी गीता जैन यांची केली होती पाहणी

या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार गीता जैन घटनास्थळी पाहणीसाठी पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न केला की, “शासनाचे पावसाळ्यात बांधकामांवरील कारवाई न करण्याचे आदेश असताना पालिकेमार्फत ही कारवाई का करण्यात आली?” असे त्यांनी म्हटले होते.   घटनेदरम्यान अभियंता शुभम पाटील यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना हसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संतापाच्या भरात जैन यांनी त्यांना कानशिलात लगावली, असा आरोप करण्यात येत होत्या.

गीता जैन : गीता काय म्हणणार?

घटनेनंतर माध्यमांशी बोलताना गीता जैन यांनी आपल्या कृतीबाबत खेद व्यक्त केला होता. “महिलांच्या डोळ्यांतून अश्रू येत असताना तो अधिकारी हसत होता. ते पाहून माझा ताबा सुटला. मी कायदा मोडला हे मला मान्य आहे, पण त्या क्षणी ती कृती आपोआप झाली,” अशी प्रतिक्रिया गीता जैन यांनी दिली होती.

Geeta Jain: गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाल्यानंतर, आम आदमी पक्षाने सादर केलेल्या तक्रारीचा विचार करून न्यायालयाने काशीमिरा पोलिसांना गीता जैन यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी आता या प्रकरणाचा सविस्तर तपास होणार आहे. या प्रकरणात माजी आमदार गीता जैन यांच्या अडचणी वाढणारा असल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा

Solapur Crime: आईकडून सततचा दुजाभाव, माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा; तरुण वकिलाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन, सोलापुरात खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.