सनातन धर्म समीक्षा मंडळ स्थापन करावे

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची मागणी

वृत्तसंस्था/ अमरावती

आंध्रप्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिरात लाडूमध्ये (प्रसादम) वापरण्यात येणाऱ्या कथित भेसळयुक्त तूप वादादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘सनातन धर्म परीक्षण बोर्डा’च्या स्थापनेचे आवाहन केले आहे.  सनातनींच्या भावना आणि प्रथांची चेष्टा केली जात असून त्यांना कमी लेखले जात आहे, यामुळे भक्तांचा विश्वास कमी होत असल्याचे पवन कल्याण यांनी म्हटले आहे.

वैश्विक हिंदू समुदायासाठी तिरुमला तिरुपति देवस्थानम एका तीर्थस्थळापेक्षाही खूप अधिक आहे, हे एक पवित्र अध्यात्मिक प्रवास आहे, तिरुपतिचा लाडू केवळ एक मिठाई नसून ही एक संयुक्त भावना आहे. आम्ही याला मित्र, परिवार आणि अनोळखी लोकांदरम्यान समान स्वरुपात वाटतो, कारण हे आमच्या सामूहिक श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक असल्याचे पवन कल्याण यांनी नमूद केले आहे.

दरवर्षी सरासरी 2.5 कोटी भाविक तिरुमला येथे येतात. सनातनींच्या भावना आणि प्रथांची चेष्टा केली जाते किंवा त्यांना कमी लेखले जाते तेव्हा हे केवळ दुखावणारे नसते, तर जगभरातील लाखो लोकांचा विश्वास आणि श्रद्धेला चक्काचूर करणारे असते. धर्मनिरपेक्षता दोन्ही बाजूला असायला हवी असे वक्तव्य पवन यांनी केले आहे.

सर्व घटकांच्या सहमतीने बोर्ड व्हावा

सनातन धर्माच्या संरक्षणासाठी बोर्डाची स्थापना सर्व घटकांच्या सहमतीने केली जावी. आमच्या श्रद्धेची सुरक्षा आणि सन्मानाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. आमचा सनातन धर्म सर्वात प्राचीन आणि निरंतर विकसित होणाऱ्या संस्कृतींपैकी एक आहे. सर्व घटकांच्या सहमतीने सनातन धर्म परीक्षण बोर्डाची स्थापना करण्याची वेळ आता आली असल्याचा दावा पवन कल्याण यांनी केला आहे.

5 वर्षांमध्ये 250 कोटीच्या बनावट तूपाचा वापर

2019-2024 दरम्यान तिरुपती येथील लाडूंमध्ये 250 कोटी रुपयांच्या बनावट तूपाचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमचे माजी कार्यकारी अधिकारी धर्म रे•ाr यांच्या चौकशीनंतर हा घोटाळा समोर आला आहे. देवस्थानमचे माजी अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रे•ाr यांना नोटीस जारी करत चौकशीसाठी हजर राहण्याचा निर्देश देण्यात आला आहे. मागील वायएसआर काँग्रेसच्या शासनकाळात हा घोटाळा झाला आहे.

Comments are closed.