सरकारने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा करणं बंद करावं, रोहित पवार यांनी सुनावले

महायुती सरकारने मदतीच्या नावावर केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच सरकारने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा करणं बंद करावं, अशा शब्दांत रोहित पवार यांनी सरकारला सुनावले आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, महायुती सरकारने मदतीच्या नावावर केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली हे आता हळूहळू समोर येत आहे. राज्यभरात 70 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं, हजारो जनावरं दगावली, बळीराजा अक्षरश: कोलमडून पडला तरी सरकारच्या काळजाला सरसकट 50 हजार रुपये मदत करण्याचा पाझर फुटलेला नाही.
हेक्टरी 50 हजार रुपये तर दिले नाहीतच, पण जी तुटपुंजी मदत दिली त्यात देखील बागायती अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहूप्रमाणे आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना कुणाला 3 रुपये तर कुणाला 4 हजार रुपये अशी तुटपुंजी मदत देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. एकप्रकारे शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला असून राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या या फसवणुकीबाबत संताप आहे. शिवाय अजूनही ना खरडून गेलेल्या जमिनीचे पैसे आले, ना जनावर दगावल्याचे पैसे मिळाले.. सरकारने आता तरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा करणं बंद करावं आणि त्यांना पुरेशी मदत द्यावी, ही विनंती!
महायुती सरकारने मदतीच्या नावावर केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली हे आता हळूहळू समोर येत आहे. राज्यभरात ७० लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं, हजारो जनावरं दगावली, बळीराजा अक्षरश: कोलमडून पडला तरी सरकारच्या काळजाला सरसकट ₹५० हजार मदत करण्याचा पाझर फुटलेला नाही.
हेक्टरी ₹५० हजार तर दिले…
– रोहित पवार (@RRPSpeaks) १३ नोव्हेंबर २०२५

Comments are closed.