नाशिकमध्ये भाजपचा काँग्रेसला ‘दे धक्का’; दुसरे माजी जिल्हाध्यक्षही ‘भाजपवासी’; ‘या’ बड्या नेत्य
नाशिकचे राजकारण: नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल (Shirish Kumar Kotwal) यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. गुरुवारी (13 नोव्हेंबर) नाशिक येथील वसंत स्मृती कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
कोतवाल यांच्यासह माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी नगरसेविका नंदिनी बोडके, युवा नेते नरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव गोवर्धने आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे नाशिक आणि चांदवड तालुक्यात भाजपला मोठा राजकीय बळ मिळाल्याचे मानले जात आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते विजय साने, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, दक्षिण जिल्हाध्यक्ष यतीन कदम, लक्ष्मण सावजी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Girish Mahajan: हा तुमचा शेवटचा पक्षप्रवेश असेल : मंत्री गिरीश महाजन
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “शिरीषभाऊ, आजपासून तुम्ही अधिकृतपणे भाजपवासी झाला आहात. देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात तुम्ही सामील झाला आहात. आता यापुढे कुठेही जाण्याची वेळ येणार नाही. भाजपमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी मोठा वाव आहे. आम्ही तुमच्या सर्व अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू. आतापर्यंत तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत काम केले. आठ वेळा आमदारकीची निवडणूक लढवली आहे. मात्र, आता हा तुमचा शेवटचा पक्षप्रवेश आहे आणि भाजपमध्ये तुम्हाला योग्य स्थान मिळेल,” असे त्यांनी सांगितले.
Shirish Kotwal: कोणत्याही स्वार्थासाठी पक्षात आलेलो नाही : शिरीष कोतवाल
भाजपमध्ये प्रवेशानंतर शिरीषकुमार कोतवाल म्हणाले की, “आजपासून आम्ही भाजपवासी झालो आहोत. कोणत्याही स्वार्थासाठी किंवा अटींसाठी आम्ही पक्षात आलेलो नाही. देशाच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून मी नाराज होतो. ती नाराजी वाढत गेली आणि अखेर या पक्षप्रवेशात रुपांतर झाली,” असे त्यांनी सांगितले.
Rahul Aher: भाजपचा बालेकिल्ला अधिक बळकट झाला : राहुल आहेर
आमदार राहुल आहेर यांनी “मी तीन निवडणुका शिरीष कोतवाल यांच्या विरोधात लढलो, पण कधीही वैयक्तिक पातळीवर टीका केली नाही. आम्ही नेहमीच तत्त्वांवर आधारित राजकारण केले. आज गिरीश भाऊंसोबत शिरीष भाऊही भाजपमध्ये आल्याने आमचा बालेकिल्ला आणखी मजबूत झाला आहे,” असे त्यांनी यावेळी म्हटले.
Nashik Politics: नाशिकमधील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
या सोहळ्यात कोतवाल यांच्यासह नरेश पाटील, नीलम पाटील, शिवाजी बस्ते, गौरव आग्रवाल, सागर निकम, भागवत जाधव, एकनाथ पगार, शिवाजी कासव, दिनेश जाधव, गुलाब पवार, बाळासाहेब शिंदे तसेच आजी-माजी सरपंचांसह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या मोठ्या प्रवेशामुळे चांदवडसह नाशिकमध्ये भाजपची ताकद आणखी वाढली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.