मित्र आले अन् चारचाकीत बसवून घेऊन गेले; अचानक पिस्तूल काढली अन्…; मित्रांनीच केला घात, पिंपरी
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील काल (बुधवारी, ता १२) चऱ्होली अलंकापुरम चौकाजवळ गोळीबार झाल्याची (Pune Crime News) घटना घडली. 1 ते 2 राऊंड फायर करत व्यावसायिक असलेल्या नितीन गिलबिलेवर हल्ला करण्यात आला. जखमी नितीन गिलबिले आणि त्याचे दोन मित्र गाडीत बसले असता त्याच दोघांनी गोळीबार (Pune Crime News) केला. नितीन गिलबिलेच्या सोबतच्या मित्रांनीच गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली. ह्या गोळीबारात नितीन गिलबिले गंभीर जखमी झाले होते, त्यांच्या वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांचा मृत्यू झाला. जागेच्या प्लॉटिंगच्या व्यवसायांच्या कारणामुळे हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नितीन गिलबिले यांच्यावर त्यांच्या मित्रांनीच गोळी (Pune Crime News)झाडली. नितीन गिलबिले आणि अमित पठारे विक्रांत ठाकूर हे तिघेही एकमेकांचे मित्र असून ते जमिनीच्या प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते, याच व्यवसायामधील व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Pune Crime News)
Pune Crime News: गिलबिले यांच्या अलंकापुरम रस्त्यावरील हॉटेलच्या दिशेने गेले
वैयक्तिक वादातून मित्रांनी डोक्यात गोळी झाडून व्यावसायिक नितीन गिलबिलेचा खून केला. वडमुखवाडी येथील अलंकापुरम फुटी रस्ता येथे काल (बुधवारी दि. १२ नोव्हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. नितीन शंकर गिलबिले (वय ३७, रा. वडमुखवाडी, चन्होली) असे खून झालेल्याचे नाव आहे. अमित जीवन पठारे (३५, रा. पठारेमळा, चहोली), विक्रांत ठाकूर (रा. सोलू, ता. खेड) अशी संशयितांची नावे आहेत. नितीन गिलबिले आणि इतर काहीजण अलंकापुरम रस्त्यावरील शेडजवळ थांबले होते. नितीन यांचा मित्र संशयित अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे चारचाकी घेऊन तेथे आले. त्यांनी गिलबिले यांना चारचाकीत बसवले. त्यानंतर ते गिलबिले यांच्या अलंकापुरम रस्त्यावरील हॉटेलच्या दिशेने गेले. दरम्यान, आरोपींनी गिलबिले यांच्यावर गोळी झाडली. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दिघी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
Pune Crime News: जमीन खरेदी-विक्री
नितीन गिलबिले यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. नितीन यांनी काही महिन्यांपूर्वी अलंकापुरम रस्त्यावर हॉटेल सुरू केले होते. तसेच व्यावसायिक गाळे बांधून भाडेतत्त्वावर दिले आहेत. ते जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसायही करत होते.
आणखी वाचा
Comments are closed.