पार्थ पवार भूखंड घोटाळा प्रकरणावरून अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी! अंबादास दानवे यांचा मोठा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या कोरेगाव पार्क-मुंढवा येथील जमीन घोटाळ्याचा व्यवहार चांगलेच अडचणीत आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहेत. हे प्रकरण रद्द केले असे म्हटले जात असले तरी मुलाचा प्रताप समोर आल्यानंतर अजित पवार यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी होत असतानाच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपकडून पार्थ पवारला वाचवले जात आहे. याच संदर्भात वर्षावर झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती, असा दावा दानवे यांनी केला.

Comments are closed.