आयपीएल ऑक्शनपूर्वी केकेआरचा मोठा डाव! ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूला दिली मोठी जबाबदारी
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने मोठी चाल खेळली आहे. केकेआरने आगामी हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर शेन वॉटसन याची नवीन सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. वॉटसन याआधी दिल्ली कॅपिटल्स संघासोबत जोडलेले होते.
केकेआरने अलीकडेच अभिषेक नायर यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. वॉटसनकडे या लीगमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून भरपूर अनुभव आहे. मात्र, कोलकात्याचा मागील हंगामातील प्रदर्शन काही खास नव्हते. 14 सामन्यांपैकी केकेआरला केवळ 5 सामन्यांतच विजय मिळवता आला, तर 7 सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
कोलकाता नाईट रायडर्सने मागील हंगामातील खराब प्रदर्शनानंतर प्रशिक्षक मंडळात मोठा बदल केला आहे. केकेआरने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी अभिषेक नायरच्या हाती सोपवली असून, आता सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत शेन वॉटसन दिसणार आहेत. वॉटसन याआधी दिल्ली कॅपिटल्स संघात रिकी पाँटिंग यांच्यासोबत काम करत होते. वॉटसनकडे या लीगमधील चांगला अनुभव आहे.
वॉटसन आयपीएलमध्ये एकूण 12 हंगाम खेळाडू म्हणून खेळले आहेत. वॉटसन इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होते. त्याशिवाय त्यांनी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना देखील अप्रतिम कामगिरी केली होती. नायर आणि वॉटसन यांना ड्वेन ब्रावो साथ देणार असून, तो संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून भूमिका निभावणार आहे.
केकेआरचं प्रदर्शन आयपीएल 2025 मध्ये काही खास राहिले नव्हते. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघ संपूर्ण हंगामभर संघर्ष करताना दिसला होता. 14 सामन्यांपैकी संघाला केवळ 5 सामन्यांतच विजय मिळाला, तर 7 सामन्यांत कोलकात्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
असं मानलं जात आहे की केकेआर यंदा लिलावाआधी अनेक स्टार खेळाडूंना रिलीज करू शकते. अजिंक्य रहाणे संघासोबत कर्णधार म्हणून कायम राहतील की नाही, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. 23.75 कोटींमध्ये विकत घेतलेला वेंकटेश अय्यरपासूनही कोलकाता आपली वाट वेगळी करू शकते.
Comments are closed.