Beauty Tips: लग्नाच्या सीझनसाठी रॉयल लूक देणाऱ्या ट्रेंडी लिपस्टिक शेड्स

लग्नाचा सीझन म्हणजे प्रत्येक मुलीचा आवडता काळ. या काळात सर्वांनाच स्वतःकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. सुंदर ड्रेस, आकर्षक दागिने आणि परफेक्ट मेकअप याशिवाय लिपस्टिक हा तुमच्या लूकचा फायनल टच असतो. योग्य शेडची लिपस्टिक लावली तर संपूर्ण लूक बदलतो आणि आत्मविश्वासही वाढतो. म्हणूनच, लग्नाच्या या सिझनमध्ये कोणते लिपस्टिक शेड्स सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहेत, हे जाणून घेऊया. (royal look trendy lipstick shades for wedding season)

लाल लिपस्टिक
लाल लिपस्टिक कधीही फॅशनमधून जात नाही. हा रंग तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक राजेशाही आणि आत्मविश्वासपूर्ण लूक देतो. साडी, लेहंगा किंवा वेस्टर्न गाऊन कोणत्याही पेहरावावर लाल शेड उठून दिसते. विशेषत: ब्राइडल लूकसाठी क्लासिक रेड हा नेहमीच पहिला पर्याय असतो.

गुलाबी लिपस्टिक
गुलाबी रंग मुलींचा नेहमीच फेव्हरेट राहिला आहे. हा रंग चेहऱ्यावर गोडवा आणि फ्रेशनेस आणतो. हळद, मेहंदी किंवा दिवसा होणाऱ्या समारंभांसाठी हलकी गुलाबी शेड अगदी योग्य वाटते. हा रंग सर्वच स्किन टोनवर सहज बसतो, त्यामुळे तो ‘ऑल-टाइम सेफ’ पर्याय ठरतो.

वाइन लिपस्टिक
रात्रीच्या रिसेप्शन किंवा पार्टीमध्ये लूकला डॅशिंग टच द्यायचा असेल तर वाइन शेड लिपस्टिक सर्वोत्तम ठरते. हा रंग तुमच्या चेहऱ्याला बोल्ड पण आकर्षक लूक देतो. वाईन लिपस्टिक वापरल्याने तुमचा मेकअप अधिक उठावदार आणि स्टायलिश दिसतो.

न्यूड आणि मॅट लिपस्टिक
आजकाल मॅट फिनिश लिपस्टिक खूप ट्रेंडमध्ये आहेत. दिवसभर टिकणाऱ्या या लिपस्टिक्स लग्नाच्या लांब समारंभांसाठी उत्तम असतात. न्यूड, पीच किंवा ब्राउन टोनमधल्या मॅट लिपस्टिकने लूकला एक क्लासी टच मिळतो. हा लूक साधा असूनही एलिगंट दिसतो.

लिपस्टिक शेड निवडताना तुमच्या स्किन टोन, पोशाखाचा रंग आणि प्रसंग यांचा विचार करा. दिवसा हलके आणि नैसर्गिक शेड्स तर रात्रीसाठी थोडे गडद आणि बोल्ड रंग अधिक योग्य ठरतात. योग्य शेड निवडल्याने केवळ तुमचं सौंदर्य वाढत नाही, तर तुमचा आत्मविश्वासही वाढतो.

Comments are closed.