ठरलं! या तारखेला होणार आयपीएल 2026 मिनी लिलाव, ठिकाणही ठरलं
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मिनी लिलाव 16 डिसेंबरला अबू धाबी येथे पार पडणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी लिलाव प्रक्रिया विदेशात होणार असून, 2024 मध्ये दुबई आणि 2025 मध्ये जेद्दाहमध्ये लिलाव झाले होते. यंदाचे लिलाव सुद्धा परदेशात होणार असल्याने क्रीडा रसिकांची उत्सुकता वाढली आहे.
फ्रेंचायझींना त्यांच्या संघासाठी आवश्यक खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजेपर्यंत सोपवायची आहे. या यादीनंतर फ्रेंचायझींनी नोंदणीकृत खेळाडूंपैकी शॉर्टलिस्ट तयार करून लिलावाची रूपरेषा ठरवेल. ट्रेड विंडो ऑक्शनच्या एक आठवड्यापर्यंत सुरू राहील, परंतु मिनी लिलावात घेतलेले खेळाडू ट्रेडसाठी उपलब्ध राहणार नाहीत.
आयपीएल रिटेन्शन यादी जाहीर होण्याआधीच मुंबई इंडियन्सने दोन मोठ्या खेळाडूंच्या डील्स पूर्ण केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सकडून शार्दुल ठाकुर (2 कोटी) आणि गुजरात टायटन्सकडून रूदरफोर्ड (2.6 कोटी) संघात घेतले गेले आहेत. या डील्सनंतर आता कोणत्या खेळाडूंना रिलीज केले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजेतेपद जिंकले, त्यामुळे त्यांच्या संघबांधणीवर सर्वांचे लक्ष असेल. तर, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी अजून विजेतेपद मिळवलेले नाही, त्यामुळे त्यांच्या संघबांधणीवरही क्रीडाप्रेमींची नजर असेल.
आयपीएल मिनी लिलावानंतर स्पर्धा सुरू होण्याच्या एक महिन्यापर्यंत ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण करता येईल. त्यामुळे संघ तयार करण्याच्या आणि रणनीती आखण्याच्या दृष्टीने फ्रेंचायझींसाठी ही महत्त्वाची वेळ ठरणार आहे.
Comments are closed.