INDA vs SAA: ऋतुराजचे शानदार शतक, सलामी सामन्यात टीम इंडियाने मारली बाजी
दक्षिण आफ्रिका अ आणि भारत अ यांच्यात पहिला अनधिकृत कसोटी सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाने 285 धावांचे लक्ष्य त्यानंतर भारतीय अ संघाकडून ऋतुराज गायकवाडने शानदार फलंदाजी करत धमाकेदार शतक झळकावले. पहिल्या अनौपचारिक वन-डे सामन्यात ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकवून संघाला विजय मिळवून दिला. सलामीला उतरलेल्या गायकवाडने 118 चेंडूत 10 चौकारांसह आपले 17वे लिस्ट-A शतक पूर्ण केले.
गायकवाडने या सामन्यात 117 धावा केल्या. वन-डे आंतरराष्ट्रीयमध्ये आतापर्यंत सहा सामन्यांत 119 धावा केल्या आहेत, त्याने शेवटचा सामना 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळला होता.
गायकवाडच्या या शतकाने भारतीय क्रिकेटतर्फे फलंदाजीसाठी उत्साह निर्माण केला आहे आणि त्याच्या उत्तम फॉर्मवर कोचिंग स्टाफ व चाहत्यांमध्ये समाधान व्यक्त झाले आहे. संघाच्या पुढील सामन्यांमध्ये देखील त्याच्याकडून अशीच फलंदाजी अपेक्षित आहे.
दक्षिण आफ्रिकेने आधीच्या डावात 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 285 धावा केल्या. डेलानो पॉटगीटर, डायन फॉरेस्टर आणि ब्योर्न फोर्टुइन यांनी अनुक्रमे 90, 77 आणि 59 धावा केल्या. भारतासाठी अर्शदीप सिंह आणि हर्षित राणाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर निशांत सिंधू, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळवली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना शुक्रवारी, 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कोलकात्याच्या इडन गार्डन्समध्ये होणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए मालिकेत ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीवर चाहत्यांचे लक्ष ठेवलं जात आहे.
Comments are closed.