दिल्ली ब्लास्ट अपडेट: लाल किल्ला १५ नोव्हेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे

सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला १५ नोव्हेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद राहणार असल्याची अधिसूचना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जारी केली आहे. 10 नोव्हेंबर रोजी देशाची राजधानी दिल्ली पूर्णपणे हादरली होती. संध्याकाळी ७ च्या सुमारास लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका कारमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत एकूण 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी अपडेट होत आहे..

Comments are closed.