जैन बोर्डिंगचे खरेदीखत अखेर न्यायालयात रद्द

शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व्यवहारातील खरेदी खत अखेर कायदेशीररीत्या रद्द करण्यास पुणे दिवाणी न्यायालयात शिक्कामोर्तब झाले.
दि. 8 ऑक्टोबर रोजी शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट व गोखले एलएलपी यांच्यामध्ये या सार्वजनिक स्मारक ट्रस्टचा तीन एकर भूखंड 231 कोटी रुपयांना विक्री करण्याबाबत खरेदी खत नोंदविण्यात आले होते. हा व्यवहार बेकायदेशीर असल्याबाबत आचार्य श्री गुप्तिनंदी जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे आंदोलन करण्यात आले होते.
या प्रकरणी राज्याचे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. 4 एप्रिल 2025 रोजी ट्रस्टची जागा विक्री करण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांनी दिलेली परवानगी 30 ऑक्टोबर 2025 रोजी रद्द करण्यात आली. त्यानंतर ट्रस्ट व गोखले बिल्डर यांनी खरेदी खत दस्त रद्द व्हावे यासाठी पुणे येथील दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायाधीश एनआर गजभिये यांनी सुनावणी घेत सदर व्यवहार रद्दबातल झाल्याने खरेदी खत दस्त रद्द करणे कामी आदेश दिले. यावेळी ट्रस्ट वतीने अॅड. ईशान कोलटकर व विकासक गोखले बिल्डर वतीने अॅड. निश्वल आनंद यांनी कामकाज पाहिले. सकल जैन समाजाच्या वतीने अॅड. अनिल पाटणी, अॅड. सुकाwशल जिंतूरकर, अॅड. योगेश पांडे, अॅड. आशीष पाटणी, अण्णा पाटील, चंद्रकांत पाटील, आनंद कांकरिया, स्वप्नील गंगवाल उपस्थित होते.

Comments are closed.