PAK vs SL: बाबर आझमच्या शतकाच्या जोरावर पाकिस्ताने सामन्यासह जिंकली मालिका, श्रीलंकेचा पराभव
पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझमने अखेर 2 वर्षांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम टाकला आहे. 14 नोव्हेंबर रोजी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाबरने नाबाद शतक झळकावले. या शतकामुळे फक्त बाबरचे कौशल्यच अधोरेखित झाले नाही, तर पाकिस्तानला सलग दुसरा विजय मिळवून देण्यातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बाबरने 119 चेंडूत 8 चौकारासह 102 नाबाद धावा केल्या.
श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 289 धावांचे आव्हान ठेवले होते, परंतु पाकिस्तानने हे आव्हान 48.2 ओव्हरमध्ये फक्त 2 विकेट्स गमावून पूर्ण केले आणि तब्बल 8 विकेट्सने विजय मिळवला. यासह पाकिस्तानने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेवर एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे.
या विजयामध्ये बाबरच्या जोडीने मोहम्मद रिझवान आणि फखर झमान यांची मोलाची कामगिलरी होती. फखर झमान आणि सॅम अयुब या सलामी जोडीने 77 धावांची भागीदारी केली, त्यानंतर सॅम 33 धावांवर बाद झाला. त्यानंतर फखर झमान आणि बाबरने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. त्यांनी 127 चेंडूत एकत्रित 100 धावा जोडल्या. फखरने 93 चेंडूत 78 धावा केल्या आणि नंतर बाबर आणि रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 105 चेंडूत नाबाद 112 धावांची जबरदस्त भागीदारी करून पाकिस्तानला विजयाची खात्री दिली. रिझवानने 54 चेंडूत 51 धावा केल्या.
श्रीलंकेसाठी दुश्मंथा चमीराने 2 विकेट्स घेतल्या. टॉस जिंकून पाकिस्तानने श्रीलंकेला पहिले बॅटिंग करण्याची संधी दिली. श्रीलंकेने 50 षटकात 288 धावा केल्या, ज्यात जनिथ लियानगेने 54, कामिंदु मेंडीस 44 आणि सदीरा समरविक्रमा 42 धावा केल्या. वानिंदु हसरंगाने अखेरच्या टप्प्यात नाबाद 37 धावा केल्या. पाकिस्तानसाठी अब्रार अहमद आणि हरीस रौफ यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या, तर वसिमने 1 विकेट मिळवली.
Comments are closed.