खरडून गेलेल्या शेतजमिनीसाठी माती मोफत मिळणार, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

अतिवृष्टीमध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले. शेतातील माती खरडून गेल्याने पिकवायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. अशा खरडून गेलेल्या शेतजमिनींसाठी माती, गाळ, मुरूम, कंकर मोफत पुरवण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

पुरामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन पुन्हा लागवडीयोग्य व सुपीक करण्यासाठी जमिनीत माती, गाळ, मुरूम, कंकर आदी गौण खनिजे टाकावी लागणार आहेत. सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत अगदीच नगण्य असल्याने त्यासाठी खर्च करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे त्यांना माती, गाळ, मुरूम, कंकर या गौण खनिजांवरील रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घर, गुरांचा गोठा, शेत व विहीर यांसाठी आवश्यक पाच ब्रास गौण खनिजासाठी रॉयल्टीमधून सूट मिळेल, असे त्यांनी सांगितले.

Comments are closed.