मोठी आघाडी घेऊन टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला हरवू शकतो? दुसऱ्या दिवसाचा खेळ कधी होणार सुरू?
India vs South Africa 1st Test Day-2 Live Cricket Score Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेचा पहिला कसोटीत सामना कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची नजर मोठी आघाडी मिळवण्यावर असेल. भारत पहिल्या दिवसाचा 1 बाद 37 धावांचा स्कोर पुढे नेऊन खेळाला सुरुवात करेल.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव – 159 धावांत गुंडाळला
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली, पण हा निर्णय पाहुण्यांना महागात पडला. भारतीय गोलंदाजांनी अथक माऱ्याच्या जोरावर संपूर्ण आफ्रिकन संघाला फक्त 159 धावांत बाद केले. शतक तर दूर, अर्धशतकही कुणाच्या वाट्याला आले नाही. एडन मार्करम 31 धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला. मुल्डर आणि जॉर्जी यांनी प्रत्येकी 24 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. 14 षटकांत 27 धावा देत 5 विकेट्स त्याने घेतल्या. टेस्ट कारकिर्दीत ही त्याची 16वी पाच विकेटची कामगिरी. यातील 13 वेळा त्याने हे SENA देशांविरुद्ध केले आहे, म्हणजेच परिस्थिती कशीही असो, बुमराहचा मारा तिथेही तितकाच प्रभावी असतो.
भारताचा पहिला डाव
पहिल्या दिवसअखेर भारताने जायसवालचे विकेट गमावून 37 धावा केल्या. यशस्वी जायसवालने 27 चेंडूत 12 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी रोहित आणि बाकीची फलंदाजी मोठी भागीदारी सेवून ठोस आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.
Comments are closed.