शाळेत जाणाऱ्या मुलांची दिनचर्या कशी असावी?
आपलं मुलं अभ्यासात हुशार असावं आणि तब्येतीनेही सुदृढ असावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण त्यासाठी पालकांची निव्वळ इच्छा असून चालत नाही तर पालक “स्व:ता” कोणते नियम पाळतात ते ही महत्वाचे असते. कारण मुलं पालकांचेच अनुकरण करत मोठे होतात.
तज्त्रांच्या मते शाळकरी मुलांच्या दिनचर्या जर ठरलेली असेल तर त्याचा परिणाम फक्त त्यांच्या अभ्यासावरच होत नाही तर शारिरीक आणि मानसिक विकासावरही होतो. यामुळे मुलांची रात्री झोपेची वेळ, सकाळी उठण्याची वेळ, नाश्ता, दुपारचे जेवण, खेळण्याची वेळ, रात्रीच्या जेवणाची वेळ ठरलेली असेल तर मुल दिवसभर फ्रेश असतात, त्यांच्यात आत्मविश्वासही वाढतो. मुलांचा बराचसा वेळ पालकांबरोबर जात असल्याने पालकांच्या हालचालींचे ते बारकाईने निरिक्षण करतात आणि तसेच वागू बोलू लागतात. एवढेच नाही तर काही घरात मुलं आणि पालकांच्या सवयीदेखील सारख्या असल्याच्या दिसतात. त्यासाठी पालकांनी काय करावे ते बघूया.
सकाळची सुरुवात
साधारणंत लहान मुलांची शाळा सकाळची असते. त्यामुळे मुलांना रोज सकाळी ६ ते ६.३० मध्ये उठण्याची सवय लावावी. त्यानंतर एक ग्लास कोमट लिंबू पाणी त्यास पिण्यास द्यावे. हलका व्यायाम करून घ्यावा. जसे की योगा, स्ट्रेचिंग. त्यामुळे मुलाचे मेंदू व शरीर सक्रीय राहते. ब्रश,आंघोळीनंतर मुलांना पौष्टीक नाश्ता द्यावा.
टिफिन
मुलांचा दिवसातला बराचसा वेळ शाळेत जातो. त्यामुळे मुलांना डब्यात घरी बनवलेले पदार्थ द्यावेत. त्याच्या टिफीनमध्ये भाजी पोळीच द्यावी. मुलांना सतत कँटीनमधले खाण्यास सांगू नये. तसेच शाळेत सगळ्यांचा सन्मान करण्याचे शिकवावे.
दुपार -संध्याकाळ
शाळेतून आल्यावर मुलांना हलका पण पौष्टीक आहार द्यावा. जसे की मूग डाळीचे चिले, पॉपकॉर्न, फळ, दूध यासारखे पदार्थ द्यावेत. तसेच जरावेळ आराम केल्यानंतर त्याला होम वर्क बदद्ल विचारावे. त्याच्याकडून तो करून घ्यावा. त्यानंतर दोन तासांनी त्याला आऊट डोअर खेळासाठी बाहेर जाण्यास प्रवृत्त करावे. त्यामुळे मुल तुमच्या शब्दात राहतात. खेळणे हा मुलांसाठी व्यायाम असतो. त्यामुळे त्यांना खेळण्यास प्रवृत्त करावे.
रात्र
मुलांना रात्रीच्या जेवणात हलका व पचणारे पदार्थ द्यावेत. जसे की भाजी, पोळी, आमटी, वरण, भात,सॅलेड जेवणानंतर १५ मिनिट कुटुंबीयांसमवेत वेळा घालवण्य़ास सांगावे. दिवस कसा गेला याबद्दल विचारावे. झोपण्याआधी दुसऱ्या दिवशीची शाळेची बँग्ज त्याने भरली का ते बघावी. जास्तीत जास्ता मुलांना रात्री ८.३० ते ९.०० मध्ये झोपवावे. त्यामुळे त्याचा शारिरीक व मानसिक विकास चांगला होतो. तसेच मुलांची स्मरणशक्तीही वाढते.
सोशल मीडिया
मुलांच्या हातात मोबाईल देण्याआधी त्यात टायमर सेट करून ठेवावा. जेणेकरून ठऱाविक वेळपर्यंतच त्यातील नेट चालू शकेल. शक्यतो मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी. मुलांचे चुकल्यास त्यास दरडावे अन्यथा मुल द्वाड होतात. त्यामुळे त्यांच्यावर जरब राहणेही गरजेचे आहे. सकारात्मक विचार करण्याची त्यांना सवय लावावी. त्यासाठी पालकांनी “स्व:ता”ही दिनचर्येचे पालन करावे. कारण मुलं जे बघतात ते बघूनच वाढतात.
Comments are closed.