IND vs SA Kolkata Test – शुभमन गिलने अचानक मैदान सोडलं, बॅटिंग करताना नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. हिंदुस्थानने 100 धावांचा टप्पा पार केला असून तीन खेळाडू बाद झाले आहेत. सध्या ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा मैदानात शड्डू ठोकून उभे आहेत.
पहिल्या दिवशी हिंदुस्थानने पाहुण्या संघाला 159 धावांमध्ये गुंडाळले होते. त्यानंतर दिवसअखेर यशस्वी जैस्वाल याची विकेट गमावून 1 बाद 37 अशी मजल मारली होती. दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानने पहिल्या तासभर एकही विकेट गमावली नाही. केएल राहुल आणि वाशिंग्टस सुंदर यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना केला. या दरम्यान राहुलने कसोटी क्रिकेटमधील चार हजार धावांचा टप्पाही पार केला.
माइलस्टोन अनलॉक ✅
4⃣0⃣0⃣0⃣ कसोटी धावा आणि मोहक केएल राहुलसाठी मोजणी 👌
त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत 5⃣0⃣ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी देखील केली 🤝
अपडेट्स ▶️ https://t.co/okTBo3qxVH #TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @klrahul pic.twitter.com/D2VEURmVhF
— BCCI (@BCCI) १५ नोव्हेंबर २०२५
दुसऱ्या विकेटसाठी सुंदर आणि राहुलमध्ये अर्धशतकीय भागिदारी झाली. दोघेही मोठी धावसंख्या करतील असे वाटत असताच आधी सुंदर 29 आणि नंतर राहुल 39 धावांवर बाद झाला. सुंदर बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल मैदानात उतरला. चौकार ठोकत त्याने उत्तम सुरुवात केली. मात्र मानेमध्ये वेदना होऊ लागल्याने त्याने मैदान सोडले.

Comments are closed.