लोअर बर्थ मिळण्यासाठी धडपडताय? रेल्वने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, कुणाला होणार फायदा? जाणून घ्य
ट्रेन तिकीट बुकिंग नियम: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट बुकिंगची (Train Ticket Booking) प्रक्रिया अधिक सुकर आणि पारदर्शक करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेने ‘RailOne’ हे सुपर अॅप लॉन्च केले आहे. या अॅपच्या मदतीने प्रवाशांना आरक्षित तसेच अनारक्षित तिकीट बुक करता येतात. त्यासोबतच, रेल्वे प्रवासाशी संबंधित जवळजवळ सर्व सेवांसाठी हे अॅप वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून कार्य करते.
Train Ticket Booking Rules: रेल्वने तिकीट बुकिंगचे नियम बदलले
लोअर बर्थ न मिळण्याच्या तक्रारी अनेक प्रवासी करतात. मात्र, रेल्वेने काही विशिष्ट गटांसाठी लोअर बर्थची विशेष तरतूद केली आहे. ही सुविधा संगणकीकृत आरक्षण प्रणालीमध्ये उपलब्ध आसनांवर अवलंबून असते. 60 वर्षांवरील पुरुष आणि 58 वर्षांवरील महिलांना, 45 वर्षांवरील महिला विशेषतः ज्या एकट्या प्रवास करतात आणि वैध प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांग प्रवाशांना लोअर बर्थ देण्याची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
Train Ticket Booking Rules: रिकामा लोअर बर्थ देण्याचा अधिकार TTE कडे
आरक्षणावेळी लोअर बर्थ न मिळाल्यास, प्रवासादरम्यान कोणता लोअर बर्थ रिकामा असल्यास तिकीट तपासणी अधिकारी (TTE) तो बर्थ पात्र प्रवाशाला देऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी TTE ला विनंती करण्याचा अधिकार आहे.
ट्रेन तिकीट बुकिंग नियम: ऑनलाइन बुकिंग मध्ये विशेष सुविधा
“Book only if lower berth is available” हा पर्याय ऑनलाइन बुकिंगदरम्यान उपलब्ध आहे. हा पर्याय निवडल्यास लोअर बर्थ उपलब्ध नसेल तर तिकीटच बुक होणार नाही. यामुळे प्रवाशांना केवळ पसंतीची आसनव्यवस्था मिळाल्यासच तिकीट निश्चित होते.
Sleeping Rules on Trains: रेल्वेतील झोपण्याचा नियम
प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच आपल्या बर्थवर झोपू शकतात. दिवसा ती जागा बसण्यासाठी वापरली जाते. RAC तिकीटधारक आणि साइड अप्पर बर्थ असलेले प्रवासी दिवसा बसण्यासाठी जागा शेअर करतात. मात्र, रात्री लोअर बर्थचा हक्क फक्त त्या बर्थधारकाचाच असतो. तसेच, आरक्षित तिकिटांसाठीची अग्रिम आरक्षण मुदत (ARP) 120 दिवसांवरून कमी करून 60 दिवस करण्यात आली आहे, म्हणजे प्रवासी आता प्रवासाच्या तारखेपूर्वी 60 दिवसांपर्यंत तिकिटे बुक करू शकतात.
आणखी वाचा
Finance: जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
आणखी वाचा
Comments are closed.