निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. निवडणूक आयोगाने तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल, आणि अखेरीस महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. राज्यातील ग्रामीण भागात सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू आहे. या भागातील मतदान 2 डिसेंबर रोजी होईल, आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींसाठी कमी आरक्षण मिळाल्याचा दावा केला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे (Babanrao Taywade) यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) यावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय.
निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार, ज्या महानगरपालिका क्षेत्रात ओबीसींसाठी 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मिळते, त्या ठिकाणी एक ओबीसी जागेचं नुकसान झालं आहे. या नियमामुळे, ओबीसींच्या आरक्षणाचा विचार करताना अपूर्णांक असलेल्या जागांचा समावेश करण्यात आलेला नाही. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात निर्देश दिले होते की, ओबीसीच्या जागांच्या संख्येची गणना करतांना अपूर्णांक दुर्लक्षित करण्यात यावा.
Rashtriya OBC Mahasangh : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा
यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळाल्याचा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलाय. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. जर निवडणूक आयोगाने यावर फेरविचार केला नाही, तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. तायवडे यांनी या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. तर एससी, एसटी आरक्षणानुसार अपूर्णांक आल्यास 0.50 व त्यापेक्षा जास्त असलेला अपूर्णांक पुढील संख्येस पुर्णांकित करण्याची मागणी देखील बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.
Maharashtra Local Body Elections Timetable : असे असेल निवडणुकीचे टाईमटेबल
नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.