राहुल गांधींनी तलावात उडी मारली, मच्छीमारी केली; बिहारच्या बेगुसराय मतदारसंघात निकाल काय लागला?
बिहार निवडणूक निकाल 2025 राहुल गांधी: बिहारचा रणसंग्राम एकतर्फी जिंकण्यात एनडीएला यश (Bihar Election Result 2025) आलंय. 243 जागांपैकी 202 जागा मिळवत भाजप, जेडीयू, लोजप या पक्षांनी एकतर्फी बाजी मारत एनडीएला बहुमत मिळवून दिलंय. या निवडणुकांमध्ये एनडीएनं जोरदार मुसंडी मारत एकतर्फी विजय मिळवला.
भाजपला 89 तर जेडीयूनं 85 जागा मिळवल्यात. तर काँग्रेसला अवघ्या 6 आणि तेजस्वी यादवांच्या राजदला 25 जागांवर समाधान मानवं लागलं. आता बिहारचा मुख्यमंत्री कोण (Bihar CM) होणार?, याची उत्सुकता लागलीय. मुख्यमंत्री पदाच्या निर्णयासाठी एनडीएच्या नेत्यांमध्ये आज बैठका होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींनी तळ्यात उडी मारुन वेधलं होतं लक्ष- (Rahul Gandhi Swimming Bihar)
बिहारमध्ये महागठबंधनने संपूर्ण 243 विधानसभेच्या जागा लढवल्या. यामध्ये राष्ट्रीय जनता जलने 143 जागा, काँग्रेसने 61 जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने 20 जागा आणि विकसनशील इंसान पार्टीने 12 जागा लढवल्या. काँग्रेसला 61 पैकी फक्त 6 जागा जिंकता आल्या. दरम्यान, बिहारमधील बेगुसराय विधानसभा मतदारसंघात (Begusarai Constituency) राहुल गांधी यांनी थेट एका तलावात उडी घेऊन मच्छिमारांसोबत मासे पकडण्याचे प्रात्यक्षिक केले. यावेळी त्यांच्यासोबत व्हीआयपी पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहनी उपस्थित होते. या मतदारसंघातही काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.
अमिता भूषण यांचा जवळजवळ 31 हजार मतांनी पराभव-
बिहारच्या बेगुसराय विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला. निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मुकेश साहनी यांच्यासोबत एक रॅली काढली आणि तलावात उतरून मासेमारी करण्याचे अनोखे तंत्रही दाखवले. तरीही, काँग्रेस उमेदवार अमिता भूषण मतदारांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले आणि भाजप उमेदवार कुंदन कुमार यांच्याकडून अमिता भूषण यांचा जवळजवळ 31 हजार मतांनी पराभव झाला.
बिहारमधील काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी- (Congress Winning Candidates List Bihar Election 2025)
1. वाल्मिकी नगर विधानसभा मतदारसंघ- सुरेंद्र प्रसाद (काँग्रेस)
2. चणपटीया विधानसभा मतदारसंघ- अभिषेक रांजन (काँग्रेस)
3. फोर्ब्सगंज विधानसभा मतदारसंघ- मनोज विश्वास (काँग्रेस)
4. अरारिया विधानसभा मतदारसंघ- अबिदुर रहमान (काँग्रेस)
5. किशनगंज विधानसभा मतदारसंघ- एमडी. कमरुल होडा (काँग्रेस)
6. मनिहारी विधानसभा मतदारसंघ- मनोहर प्रसाद सिंह (काँग्रेस)
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.