IPL 2026: मुंबई इंडियन्सने 5 वर्षांनंतर अर्जुन तेंडुलकरला रिलीज केले? आता या टीमकडून खेळणार! जाणून घ्या सविस्तर

मुंबई इंडियन्स आणि अर्जुन तेंडुलकर (Mumbai Indians & Arjun Tendulkar) यांची पाच वर्षांची सोबत आता संपली आहे. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सुपर जायंट्सकडे (LSG) ट्रेड केले आहे. IPL 2026 मध्ये अर्जुन LSG च्या स्क्वाडचा भाग असणार आहे.

अर्जुनला MI फ्रँचायझीनं 2021 साली आपल्या टीममध्ये घेतलं होतं, पण त्याचा डेब्यू दोन वर्षांनी म्हणजे 2023 मध्ये झाला.

लखनऊ सुपर जायंट्सने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपयांत ट्रेड केलं आहे. MI मध्येही त्याला एवढीच सॅलरी मिळत होती. आतापर्यंतच्या आपल्या छोट्या IPL करिअरमध्ये पाच सामन्यात अर्जुनने 3 विकेट घेतल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट 9.37 इतका आहे.

मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत अर्जुनचे आभार मानले. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की,
अर्जुन तेंडुलकर, मुंबई इंडियन्स परिवाराचा भाग बनल्याबद्दल धन्यवाद. लखनऊ सुपर जायंट्ससोबत तुझ्या करिअरचा नवा अध्याय यशस्वी ठरो, हीच आमची इच्छा. तुझ्या प्रगतीमध्ये आमचा सहभाग असणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुढेही तू उत्कृष्ट प्रदर्शन करत नवी ओळख निर्माण करशील अशी आशा आहे.

अर्जुन तेंडुलकर आता डोमेस्टिक क्रिकेटमध्येही मुंबईकडून खेळत नाही. ऑगस्ट 2022 मध्ये त्याने मुंबई टीम सोडली होती. 2022-23 च्या घरेलू हंगामात त्याने गोव्याकडून खेळले. आता IPL मधूनही त्याचे मुंबईसोबतचे नाते तुटले आहे.

मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सकडून मयंक मारकंडेला देखील ट्रेड करून घेतले आहे. त्याला 30 लाखांचे वेतन मिळणार आहे, जे KKR मध्येही तितकेच होते. आयपीएल करिअरमध्ये मारकंडेने 37 सामने खेळून 37 विकेट घेतल्या आहेत.

Comments are closed.