स्वप्नातील घर खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींवर लक्ष ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता


मालमत्ता खरेदी टिपा नवी दिल्ली : भारतातील सर्व राज्यांमध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. देशातील टिअर 1 शहारंसह टिअर 2 आणि टिअर 3 शहरांमध्ये घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. लोक आयुष्यभराची कमाई एक खरेदी करण्यासाठी लावत आहेत. मालमत्तेच्या किमती  कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. या स्थितीत घर, दुकान आणि दुसरी प्रॉपर्टी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ज्यामुळं भविष्यात तुम्हाला त्रास सहन करावा लागणार नाही.

Property Buing Tips : घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

रिअल इस्टेट मार्केटमध्ये दोन प्रकारच्या मालमत्ता उपलब्ध असतात. एक अंडर कन्स्ट्रक्शन  तर दुसरी रेडी टू मुव्ह प्रॉपर्टी अशते. रेडी टू मुव्ह प्रॉप्रटीमध्ये घरं तयार असतात. घर खरेदी केल्यानंतर तातडीनं नव्या घरात शिफ्ट होऊ शकता. अनेक जण हा पर्याय स्वीकारतात. रेडी टू मुव्ह प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवता आल्या पाहिजेत.

घर किंवा  मालमत्ता किती जुनी?

रिअल इस्टेट जाणकारांच्या नुसार घर जितकं  जुनं असेल त्याची नव्या घराच्या तुलनेत किंमत कमी असू शकते. यासाठी मालमत्ता किती जुनी किंवा किती वर्षाची आहे, याची माहिती घ्यावी. यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअर, आजू बाजूचे लोक आणि प्रॉपर्टी डीलरसोबत चर्चा करु शकता. ठोस माहिती मिळाल्यानंतर घर खरेदी करण्याचा विचार करावा.

रिअल इस्टेट मार्केटमध्ये अनेकांना फसवणुकीला सामोरं जावं लागत. प्रॉपर्टी डीलर आणि खरेदीदारांमध्ये वाद होत राहतात. त्यामुळं यापासून वाचण्यासाठी तुम्हाला मालमत्तेच्या मालकीच्या स्थितीची माहिती असणं आवस्यक आहे. तुम्ही प्रॉपर्टी पेपर घेऊन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊ शकता, त्यांच्याकडून घर कुणाच्या नावावर नोंदणीकृत आहे याची माहिती घेऊ शकता.

घर खरेदी करण्यापूर्वी पायाभूत सुविधांची चौकशी करावी. वीज, पाण्याची स्थिती समजून घ्यावी. पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत आहे का याचा विचार करावा. त्यासोबत आजूबाजूचं मार्केट, शाळा, रुग्णालय या सारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का याची चौकशी करावी.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.