PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना ट


राजकारण: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत (Bihar Election Result 2025) एनडीएने (NDA) मोठा विजय मिळवत तब्बल 202 जागा जिंकल्या आहेत. विरोधकांच्या महागठबंधनला अवघ्या 35 जागांवर विजय मिळवण्यात यश आले. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत विरोधकांना मोठा धक्का बसलाय. बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. ‘चंद्रावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवशक्ती कॉलनी उघडली ‘ मंत्री जयकुमार रावल यांनी अजब दावा करत शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावलाय .

जयकुमार रावल यांचा आदित्य ठाकरे यांना टोला

भाजपाने अमेरिकेत देखील निवडणूक लढवावी अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर त्याला मंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर दिले असून आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री होते त्यामुळे त्यांना तसं वाटलं असेल ते भाजपासोबत जुने मित्र असल्याने त्यांना तसं वाटलं असेल मोदींचे संपूर्ण जगभरात वजन असून कोणतेही देशातील प्रश्न सोडवण्यासाठी मोदींना बोलवले जाते अमेरिकेत देखील आमचे फ्रेंड्स ऑफ बीजेपी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रावर देखील शिवशक्ती कॉलनी उघडणार असल्याचं वक्तव्य मंत्री जयकुमार रावल यांनी केला आहे भारताचे नाव जगभरात मोठे करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत  अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली…

भाजपने अमेरिकेतही निवडणूक लढवावी

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. जे काही निकाल आले, त्याचा धक्का बसलेला नाही. मी निवडणूक आयोगाच अभिनंदन करतो, हा त्यांचा विजय आहे. भाजपने आता अमेरिकेतही निवडणूक लढवली असे आदित्य ठाकरे म्हणाले.  जसं तुम्ही पाहिलं तसं आम्ही पाहिलं आहे. जे काही निकाल आले त्याचा धक्का बसलेला नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो हा त्यांचा विजय आहे. मतदानाचा अधिकार काढून टाकल्यावर काय होत हे आज दिसल्याचे ठाकरे म्हणाले. नितिश कुमार यांची पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरु होती, असेही ठाकरे म्हणाले. तेजस्वी यादव यांचा अजेंडा नोकऱ्या देणं हा होता. राहुल गांधी यांनी वोट चोरी दाखवली. वोट चोरी झाली होती. लवकरच आम्ही सगळे मुद्दे बाहेर काढू अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

आणखी वाचा

Comments are closed.