हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू


धुळे: धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात शनिवारी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरलाय. आईने आपल्या दोन 3 आणि 6 वर्षांच्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केलीय. गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27)मृत मुलांमध्ये मुलगा दुर्गेश (वय 6) आणि मुलगी दुर्वा (वय 3) यांचा समावेश आहे.कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून प्राप्त होत आहे. पुढील तपास सुरु आहे.(Dhule News)

Dhule News: घटना कशी उघडकीस आली?

विहिरीत 30 ते 40 फूट खोल पाणी असल्याने घटनेची लगेच कोणालाही कल्पना आली नाही. तिघांचा शोध सुरू झाल्यावर जवळपास संशय निर्माण झाला आणि अखेर विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाल्यावर तपासाची दिशा स्पष्ट झाली. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे… विहिरीत सुमारे 30 ते 40 फूट खोल पाणी असल्याने ही घटना त्वरित कोणाच्या नजरेस आली नाही. तिघांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर गावात शोककळा पसरली.

कौटुंबिक वादातून आत्महत्येचा अंदाज

प्राथमिक चौकशीतून असे दिसून आले आहे की, गायत्री काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. कुटुंबातील वाद, मतभेद आणि वाढत चाललेलं नैराश्य या सर्व कारणांमुळे तिने टोकाचे पाऊल उचलले असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस अधिक तपास करत असून कुटुंबीयांचे निवेदन घेतले जात आहे.

पोलिस तपास सुरू, गावात शोककळा

घटनास्थळी सोनगीर पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले. सोनगीर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. गावकऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. मुलांचे निष्पाप मृतदेह पाहून अनेकांचे डोळे पाणावले. स्थानिकांनी प्रशासनाला अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी महिलांसाठी समुपदेशन व मानसिक आरोग्य सहाय्याची गरज असल्याचंही सांगितलं. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण निकुंभे गाव शोकात बुडालं आहे. पोलिसांचा तपास पुढे काय निष्पन्न करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा:

मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी

आणखी वाचा

Comments are closed.