मॅक्सवेल-इंग्लिससह 5 खेळाडू रिलीज, तरीही रिटेंशननंतर पंजाब किंग्सचा संघ अधिक मजबूत! जाणून घ्या सविस्तर

आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये फायनलपर्यंत मजल मारणाऱ्या पंजाब किंग्सने (Punjab kings) ऑक्शनपूर्वी आपल्या बहुतांश खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, श्रेयस अय्यरच्या (Shreyas iyer) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर जोश इंग्लिसलाही पंजाबच्या संघातून रिलीज करण्यात आले आहे.

वेगवान गोलंदाज कुलदीप सेनलाही पंजाब किंग्सने टीममधून सोडलं आहे. प्रवीण दुबे देखील रिलीज केलेल्या खेळाडूंच्या यादीत सामील आहे. एरोन हार्डीही टीम मॅनेजमेंटचं विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरला, त्यामुळे त्याला देखील रिलीज करण्यात आलं आहे.

तरीही, पंजाबने पुढच्या हंगामासाठीही संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यरकडेच दिलेले आहे. 11 वर्षांनंतर संघाला फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या बहुतांश खेळाडूंवर पंजाबने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

Comments are closed.