नांदेड हादरलं! वडिलांच्या 16 वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड : खून का बदला खून म्हणत एखादा प्रसंग चित्रपटात आपण पाहतो. मात्र, 16 वर्षांपूर्वी झालेल्या वडिलाच्या खूनाचा मुलाने बदला घेत एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार नांदेड (Nanded) जिल्ह्यात घडला आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नांदेड शहरालगत असलेल्या बळीरामपुर पंचशीलनगर येथे घडली. नांदेड ग्रामीण पोलिसांनी घटनेच्या अवघ्या तीन तासाच्या आत खूनाचा उलघडा करत तिघांना अटक देखील केली. राष्ट्रपाल तुकाराम कपाळे (वय 39 रा. पंचशीलनगर ) अस मयताचं नाव आहे. सोळा वर्षापूर्वी झालेल्या खूनाच्या घटनेत मृत व्यक्ती हा आरोपी होता. त्यातून आरोपीने खूनाचा (Crime news) बदला खून म्हणत ही हत्या केली. या घटनेने बळीरामपूर हदरलं आहे, विशेष म्हणजे तिन्ही आरोपी अवघ्या 19 ते 20 वयोगटातील आहेत.
मयत राष्ट्रपाल कपाळे हा बळीरामपूर येथील पंचशीलनगर येथील रहिवासी असून 2009 साली आरोपी नागेश गवळे (वय 20 रा.वाघाळा) याचे वडील राजेंद्र गवळे यांचा खून करण्यात आला होता. यात राष्ट्रपालसह इतर तीन जण आरोपी होते. काही वर्षापूर्वी राष्ट्रपाल आणि इतर दोन साथीदारांची या खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली. जेलमधून सुटल्यानंतर तो ऑटो चालवून उदरनिर्वाह करायचा, तसेच घरी किराणा दुकान देखील होते. इकडे वडिलाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आरोपी नागेश गवळे हा षडयंत्र रचत होता. शुक्रवारी रात्री सात वाजताच्या सुमारास राष्ट्रपाल हा दुकानात असल्याची माहिती आरोपीला मिळाली, त्यानंतर आरोपी नागेशने आपल्या इतर दोन साथीदारांना घेऊन तीक्ष्ण हत्याराने राष्ट्रपालच्या शरीरावर वार केले आणि सर्वजण फरार झाले. रक्तबंबाळ झालेल्या राष्ट्रपालचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला आरोपीबाबत माहिती मिळणे पोलिसासमोर आव्हान बनले होते. मात्र, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी तपासाची चक्री फिरवत तीन तासाच्या आत प्रकरण उघडकीस आणले. शिवाय नागेश राजेंद्र गवळे (वय 20.रा शाहूनगर वाघाळा), अभिजीत राणू गजभारे (वय 20 रा.धनेगाव), लकी राजकुमार पारखे (वय 19 रा.गौतमनगर किल्ला रोड) या आरोपींना अटक केली. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी खून केल्याचे पोलीस तपासात प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.