रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडे का गेला? महेंद्रसिंह धोनीचं कनेक्शन समोर,चर्चेनं सर्व हैराण


चेन्नई: चेन्नई सुपर किंग्जनं राजस्थान सोबत ट्रेड करुन संजू सॅमसनला संघात घेतलं. त्या बदल्यात चेन्नईनं रवींद्र जडेजा आणि सॅम करन या दोघांना राजस्थानमध्ये पाठवलं. रवींद्र जडेजाच्या राजस्थानमध्ये जाण्यापेक्षा जास्त चर्चा त्यानं चेन्नईची साथ सोडण्याबाबत सुरु आहेत. अखेर बारा वर्षानंतर रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्ज सोडण्यासाठी का तयार झाला अशा चर्चा सुरु आहेत. रवींद्र जडेला चेन्नई सोडण्यासाठी भाग पाडलं गेलं किंवा त्याला राजस्थानकडून मोठी ऑफर देण्यात आलीय का अशा चर्चा सुरु आहेत. मात्र एका मीडिया रिपोर्टनुसार ट्रेड डील होण्यापूर्वी रवींद्र जडेजा आणि एम एस धोनी यांच्यात मनमोकळेपणानं चर्चा झाली होती. त्यानंतर हा निर्णय झाला.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार जेव्हा ट्रेड डील सुरु झाली नव्हती तेव्हा रवींद्र जडेजा आणि एम एस धोनी यांच्यात  सविस्तर आणि मनमोकळी चर्चा झाली होती. त्यामध्ये जडेजानं चेन्नई सुपर किंग्जपासून जाण्याचं सर्वांच्या हिताचं आहे, यावर सहमती झाल्याचा दावा करण्यात आला आङे.

नूर अहमद चेन्नई सुपर किंग्जमध्ये आल्यानं व्यवस्थापन रवींद्र जडेजाच्या भूमिकेसाठी वेगवेगळे पर्याय शोधत होते. रवींद्र जडेजाचं प्लेईंग इलेव्हनमधील स्थान संकटात आलं होतं. याबाबत धोनीनं जडेजासोबत मोकळेपणानं चर्चा केली होती. ज्यानंतर रवींद्र जडेजानं चेन्नई सुपर किंग्जची टीम सोडणं योग्य असेल याबाबत निर्णय योग्य ठरेल असा निर्णय झाला.

रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्जनं गेल्या आयपीएलमध्ये 18 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. मात्र, राजस्थाननं त्याला 14 कोटींमध्ये ट्रेड केलं आहे. भारताचा माजी क्रिकेटर आकाश चोप्रानं याबाबत बोलताना म्हटलं की 14 कोटींमध्ये चेन्नई सारखी टीम सोडून राजस्थानमध्ये जाणं पटलेलं नाही. चोप्रा म्हणाला की राजस्थानची टीम त्याला आणखी कोणती तरी भूमिका देणार असेल त्यामुळं त्यानं 14 कोटींमध्ये संघ बदलण्याचा निर्णय घेतला.

CSK रिटेन्शन लिस्ट: एमएस धोनी, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (ट्रेड), शिवम दुबे, देवाल्ड ब्रेविस, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, नॅथन एलिस, श्रेयस सिंग, मुकेश गोपाल, मुकेश गोपालन

CSK रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी: राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, शेख रशीद, रचिन रवींद्र, विजय शंकर, कमलेश नागरकोटी, मथीशा पाथिराना

दरम्यान, चेन्नईनं कॅप्टन म्हणून ऋतुराज गायकवाडला पुन्हा संधी दिली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.