IND vs SA Kolkata Test – कर्णधार शुभमन गिलला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेलं, अतिदक्षता विभागात उपचार सुरू

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या लढतीवर हिंदुस्थानचे वर्चस्व दिसत असले तरी एक चिंतेची बातमी आहे. कर्णधार शुभमन गिल हा पहिल्या डावात 4 धावांवर खेळत असताना रिटायर्ड हर्ट झाला होता. मानदुखीमुळे त्याने मैदान सोडले होते. त्यानंतर तो मैदानात उतरला नाही. त्यामुळे हिंदुस्थानचा पहिला डाव 7 बाद 189 धावांवर आटोपला. आता दुसऱ्या डावातही गिलची मैदानावर उतरण्याची शक्यता कमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे.

Comments are closed.