Fashion Tips : कमी बजेटमध्ये सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी वापरा या ट्रिक्स
सुंदर, आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी खूप जास्त पैसा लागतो असा तुमचा गैरसमज असेल तर तो आताच काढून टाका. कारण स्टायलिश दिसणे हे केवळ पैशांवर अवलूंबन नाही. तुम्ही तुमच्याकडे असलेले कपडे, एक्सेसरीज यांचा योग्य वापर केल्यास कमी बजेटमध्ये देखील सुंदर आणि स्टायलिश दिसू शकता. आज आपण अशाच काही ट्रिक्स जाणून घेणार आहोत.
- शरीरयष्टीनुसार कपड्यांची निवड करावी. खूप जास्त सैल आणि जास्त फिटींगचे कपडे लूक बिघडवतात हे लक्षात घ्या. तुमच्या वॉडरोबमध्ये व्हाईट टी शर्ट, ब्लँक पँट, डेनिम जॅकेट्सचे कलेक्शन असले पाहिजे. या कपड्यांसोबत नवनवीन ऍक्सेसरीज, शुज घालून नवा लूक तयार करता येतो.
- फॅशन ट्रेंडनुसार कपडे घालावेत. पण हा ट्रेंड आपल्याला सुट होतो की, नाही याचाही विचार करावा.
- स्वस्त पण स्टायलिश ऍक्सेसरीज तुमचा लूक पूर्णपणे बदलू शकतात. यासाठी तुम्ही साधे नेकलेस, कानातले, बेल्ट किंवा स्कार्फ अशा वस्तूंचे कलेक्शन ठेवावे. योग्य रंग किंना पॅटर्न निवडल्याने अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही स्टायलिश नक्कीच दिसू शकता.
हेही वाचा – Wedding Looks: जगभरातील नववधूंचे आकर्षक पेहराव; संस्कृती बदलली की बदलतो वधू लूक
- बारीक प्रिंट, छोटी नक्षी असणारे कपडे कायमच आकर्षक लूक देतात. त्यामुळे असे कपडे घाला.
- बाहेर जाताना परफ्यूम नक्की वापरा. कपडे महाग नसतील तरी चालेल पण परफ्यून उंची असावा.
- अनेक महिलांचा असा समज असतो की, महागड्या सौंदर्यप्रसाधनांनी सुंदर लूक मिळतो. पण, या गोष्टीत तथ्य नाही. त्याऐवजी घरगुती DIY मास्क आणि उपचारांनी तुमची त्वचा आणि केस सुंदर बनवू शकता. जसे की, हळद-दुधाचा फेस मास्क, खोबऱ्याचे तेल केसांसाठी वापरावे.
- घड्याळ, चष्मा, गॉगल, पर्स या गोष्टी निवडताना काळजीपूर्वक खरेदी कराव्यात. यात माईल्डपणा हवा भपकेपणा नको.
- सतत काही महिन्यांनी हेअरस्टाईल बदलत राहावी. यामुळे नवा लूक मिळतो.
- शूज आणि सँडल पूर्ण लूकला फिनिशिंग देण्याचे काम करतात. त्यामुळे महागड्या ब्रँडऐवजी उत्तम आणि टिकाऊ शूज आणि सँडल वापरावेत. तसेच त्यांची कायम स्वच्छता राखावी.
- आत्मविश्वास.. तुम्हाला सुंदर, आकर्षक आणि स्टायलिश दिसायचे असेल तर पेहरावासोबत आत्मविश्वास हवा. तुमच्या वागण्या-बोलण्यातून, चालण्यातून आत्मविश्वास दिसायला हवा.
हेही वाचा – एक्सपायर मेकअप प्रॉडक्ट रियूज करण्याच्या भन्नाट आयडीया
Comments are closed.