IND vs PAK : रविवारी महामुकाबला, आशिया कप स्पर्धेत भारत-पाक भिडणार, या ठिकाणी पाहा सामना
Rising Star Asia Cup: टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा आशिया कप 2025 मध्ये साखळी, बाद फेरी आणि फायनल अशा तीन सामन्यांमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर महिला संघाने वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पराभूत करून चाहत्यांना आनंदित केले. काही दिवसांपूर्वी रॉबिन उथप्पाच्या नेतृत्वाखाली भारताने हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेतही पाकिस्तानला धुळ चारली. आता इंडिया ए टीम पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी सज्ज झाली असून या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना रविवारी, 16 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना कुवेतच्या राजधानी दोहातील वेस्ट एन्ड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार सामन्याची सुरुवात रात्री 8 वाजता होईल, तर त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. चाहत्यांना हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल, तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाइव्ह पाहण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
जितेश शर्मा या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे, तर पाकिस्तानचा कर्णधार इरफान खान आहे. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात विजयी सुरुवात केली आहे. भारताने यूएईला हरवले, तर पाकिस्तानने ओमानवर मात केली आहे. त्यामुळे सलग दुसरा सामना जिंकण्याची संधी दोन्ही संघांसमोर समान आहे. यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे.
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. यूएई विरुद्ध सामन्यात वैभवने आपल्या मोहिमेतील पहिल्या सामन्यात 144 धावा केल्या होत्या. आता पाकिस्तानविरुद्ध त्याची कामगिरी कशी राहील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. इंडिया ए आणि पाकिस्तान ए यांच्यातील हा सामना स्पर्धेच्या टप्प्यात अत्यंत महत्वाचा ठरणार असून दोन्ही संघ विजयी सुरु ठेवण्यासाठी मैदानावर जोरदार खेळी करतील.
Comments are closed.