पेढ्यातून गुंगीचे औषध; बेशुध्द असताना नको ते कृत्य अन् रेकॉर्डिंग, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमक
धुळे : धुळे शहरातील एका मुख्याध्यापकाने पेढ्यातून गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेकडून तब्बल ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये देखील उकळले. पीडितेने शुक्रवारी पश्चिम देवपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. सुकलाल रामभाऊ बोरसे (वय ५३, रा. विवेकानंदनगर, देवपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, बोरसे याने पीडित महिलेला सुरुवातीला आर्थिक मदत केली होती. यातून त्यांची ओळख वाढत गेली. याचा गैरफायदा घेत, १७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास, बोरसे याने महिलेला पेढ्यातून गुंगीचे औषध दिले. महिला शुद्धीवर नसताना तिच्यावर अत्याचार केला आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला.
Dhule Crime News: व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्या अन् ६० लाखांची खंडणी
अत्याचार केल्यानंतर, मुख्याध्यापक बोरसे याने महिला बेशुध्द असताना तिच्यासोबत काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या धमकीच्या आधारावर त्याने पीडित महिलेकडून वेळोवेळी सुमारे ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये उकळले. आर्थिक फसवणुकीसोबतच, व्हिडीओच्या आधारावर ब्लॅकमेल करत बोरसे याने पीडितेवर वेळोवेळी अत्याचारही केला.
Dhule Crime News: सही असलेले धनादेशही ठेवून घेतले
पैशांव्यतिरिक्त, मुख्यध्यापकाने पीडित महिलेचे सही असलेले पाच ते सहा धनादेश देखील स्वतःकडे ठेवून घेतले. अखेरीस, पीडित महिलेने पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि मुख्याध्यापक सुकलाल बोरसे यांच्याविरोधात सविस्तर तक्रार दाखल केली. त्यानुसार, पश्चिम देवपूर पोलिसांनी तातडीने मुख्याध्यापक सुकलाल बोरसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याच रात्री त्याला अटक केली.
Dhule Crime News: ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन वर्ष महिलेवर अत्याचार
संबंधित मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती. या आर्थिक मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. एवढ्यावरच या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पिढीत महिला सोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ वायरल करण्याचे धमकी देऊन तब्बल 59 लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन वर्ष महिलेवर अत्याचार केला. अखेर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेत गजाआड केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.