मी सतत कामात असते आणि… ड्रग्ज घोटाळ्याच्या आरोपांवर नोरा फतेहीने सोडलं मौन

बॉलीवूडची बोल्ड अॅण्ड ब्युटिफूल अभिनेत्री नोरा फतेही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधित ड्रग्ज पार्ट्यांबाबतच्या चौकशीत अभिनेत्री नोरा फतेहीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे नाव घेतले जात आहे. तेव्हापासूनच तिला सोशल मीडियावर ट्रोलींगला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता अभिनेत्रीने या प्रकरणावर मौन सोडले आहे. तिने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आणि ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले.
नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नोट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे. “मी पार्ट्यांमध्ये जात नाही. मी सतत काम करत असते. मला वैयक्तिक आयुष्य नाही. त्यामुळे मी अशा लोकांशी स्वतःला जोडत नाही. जर मला कामातून वेळ मिळाला तर मी दुबईतील माझ्या घरी किंवा जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवते, असे नोराने पोस्टमध्ये म्हटले आहे.

मी माझ्या स्वप्नपूर्तीसाठी दिवस रात्र काम करतेय, मेहनत घेतेय. अशा कोणत्याही अफवावंर विश्वास ठेवू नका. मला असं वाटतय की आता माझं नाव टार्गेट करण्यासाठी सोप झालंय. अशा गोष्टी यापूर्वीही झाल्यात आणि तुम्ही मला कितीही बरबाद कऱण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला ते शक्य नाही. त्यामुळे उगाचच माझे फोटो वापरून खोट्या बातम्या पसरवू नका, याचे परिणाम वाईट होतील, असे म्हणत नोराने ट्रोलर्सला सुनावले आहे.

Comments are closed.