अखेर पडदा उघडला! IPL 2026 च्या लिलावाची तारीख जाहीर; अबू धाबीमध्ये ‘या’ दिवशी होणार पैशांची उधळ


BCCI ने IPL 2026 लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले: इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या 19व्या हंगामासाठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. शनिवारी सर्व संघांनी आपापली रिटेन्शन लिस्ट जाहीर केली असून कोणत्या संघाकडे किती रिक्त स्लॉट्स आहेत आणि त्यांच्या पर्समध्ये किती रक्कम उपलब्ध आहे, हे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक पर्स बॅलन्स कोलकाता नाईट रायडर्सकडे तर सर्वात कमी मुंबई इंडियन्सकडे आहे.

77 स्लॉट्स, 237 कोटींची खरेदी!

एका आयपीएल टीममध्ये कमाल 25 खेळाडू ठेवता येतात. याआधी सर्व संघांनी काही खेळाडूंना रिलीज केले असून उरलेल्या जागांसाठी 16 डिसेंबर रोजी बोली लावली जाणार आहे. सर्व 10 संघांकडे मिळून 77 रिक्त स्लॉट्स आहेत, ज्यात 27 विदेशी खेळाडूंच्या जागा आहेत. एकूण पर्स बॅलन्स 237 कोटी रुपये असून ही संपूर्ण रक्कम या लिलावात खर्च केली जाण्याची शक्यता आहे.

IPL 2026 ऑक्शन कधी आहे? (When is IPL 2026 Mini Auction)

आयपीएल 2026 चा लिलाव मंगळवार, 16 डिसेंबर रोजी होणार आहे.

IPL 2026 ऑक्शन कुठे होणार? (Where will IPL 2026 Mini Auction)

यंदाही आयपीएल ऑक्शन भारतात न होता अबू धाबी येथे होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

कोणाकडे किती रुपये शिल्लक?

कोलकाता नाईट रायडर्स (KKR पर्स बॅलन्स 2026)

  • उर्वरित स्लॉट्स – 13
  • पर्स बॅलन्स – 64.3 कोटी रुपये

चेन्नई सुपर किंग्ज (CSK पर्स बॅलन्स 2026)

  • उर्वरित स्लॉट्स – 9
  • पर्स बॅलन्स – 43.4 कोटी रुपये

सनरायझर्स हैदराबाद (SRH पर्स बॅलन्स 2026)

  • उर्वरित स्लॉट्स – 10
  • पर्स बॅलन्स – 25.5 कोटी रुपये

लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी पर्स बॅलन्स 2026)

  • उर्वरित स्लॉट्स – 6
  • पर्स बॅलन्स – 22.95 कोटी रुपये

दिल्ली कॅपिटल्स (DC पर्स बॅलन्स 2026)

  • उर्वरित स्लॉट्स – 8
  • पर्स बॅलन्स – 21.8 कोटी रुपये

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB पर्स बॅलन्स 2026)

  • उर्वरित स्लॉट्स – 5
  • पर्स बॅलन्स – 16.4 कोटी

राजस्थान रॉयल्स (RR पर्स बॅलन्स 2026)

  • उर्वरित स्लॉट्स – 9
  • पर्स बॅलन्स – 16.05 कोटी

गुजरात टायटन्स (GT पर्स बॅलन्स 2026)

  • उर्वरित स्लॉट्स – 6
  • पर्स बॅलन्स – 12.9 कोटी

पंजाब किंग्ज (PBKS पर्स बॅलन्स 2026)

  • उर्वरित स्लॉट्स – 4
  • पर्स बॅलन्स – 11.5 कोटी

मुंबई इंडियन्स (MI पर्स बॅलन्स 2026)

  • उर्वरित स्लॉट्स – 5
  • पर्स बॅलन्स – 2.75 कोटी

हे ही वाचा –

IPL 2026 Remaining Purse: केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.