वैभव सूर्यवंशीच्या रडारवर पाकिस्तान! टीम इंडियाला मिळणार सेमीफायनलचं तिकीट? जाणून घ्या Points T


भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 गुण सारणी : दोहामध्ये सुरू असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. आज या टूर्नामेंटमधील सर्वात मोठी आणि सर्वाधिक प्रतिक्षित लढत रंगणार आहे. वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा येथे भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ असा धुरळा उडवणारा सामना खेळला जाणार आहे. फॅन्स या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

परंतु भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी या सामन्याबाबत एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेणे गरजेचे आहे. भारत अ संघाने यूएईविरुद्धचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता खेळला होता. मात्र भारत अ – पाकिस्तान अ सामन्याची वेळ बदली आहे.

भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ सामना किती वाजता सुरू होईल?

भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ सामना रात्री 8 वाजता (IST) सुरू होईल. त्याच दिवशी दुपारचा पहिला सामना ओमान विरुद्ध यूएई दुपारी 3 वाजता (IST) खेळला जाईल. भारतीय संघ ग्रुप बीमध्ये पाकिस्तान अ, ओमान आणि यूएई यांच्यासोबत आहे. यूएईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत अ संघाने तब्बल 148 धावांनी मोठा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ग्रुप बीच्या उद्घाटन सामन्यात पाकिस्तान अने ओमानचा पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान अ सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियाला मिळणार सेमीफायनलचं तिकीट?

लीग स्टेजमध्ये प्रत्येक संघ तीन सामने खेळणार खेळणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सेमीफायनल गाठतील. म्हणजे आज जर भारताने पाकिस्तानचा पराभव केला तर थेट सेमीफायलनच सेमीफायनलचं मिळेल. 23 नोव्हेंबरला स्पर्धेची फायनल रंगणार आहे. आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मधील सर्व सामने दोहा येथेच खेळले जात आहेत. स्पर्धेचे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर थेट पाहता येतील. ओटीटीवर फॅनकोड आणि Sony LIV अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध आहे.

ग्रुप ए मध्ये कोणाता संघ आहे पहिल्या स्थानी….

आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मध्ये शनिवारी (15 नोव्हेंबर) दोन रोमांचक सामने खेळले गेले. ग्रुप ए च्या पहिल्या सामन्यात हाँगकाँगवर बांगलादेश ए संघाने 8 विकेट्सने मोठा विजय मिळवला. हाँगकाँगने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 बाद 167 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना बांग्लादेश अ संघाने अवघ्या 11 षटकांत 2 विकेट्सवर 171 धावा करत सहज विजय मिळवला आणि 2 गुण मिळवले.

ग्रुप ए च्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान अ संघाने श्रीलंका अ संघावर 3 विकेट्सने मात केली. श्रीलंकेने 20 षटकांत 9 बाद 170 धावा उभारल्या. त्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान अ संघाने 19.5 षटकांत 7 बाद 171 धावा करत विजय आपल्या नावावर केला आणि 2 गुणांसह स्पर्धेत दमदार एन्ट्री घेतली.

ग्रुप ए ची पॉइंट्स टेबल स्थिती

बांगलादेश अ – धाव दर +7.195, प्रथम क्रमांक

अफगाणिस्तान अ – आरएन. +0.10.122, दुसरा क्रमांक

हे ही वाचा –

अखेर पडदा उघडला! IPL 2026 च्या लिलावाची तारीख जाहीर; अबू धाबीमध्ये ‘या’ दिवशी होणार पैशांची उधळण

आणखी वाचा

Comments are closed.