ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 जणांची तोफ धडाडणार; नगरपालिका अन् नगरपंचायतीसाठी स्टार प्रचारकांची घो


उद्धव ठाकरे शिवसेना स्टार प्रचारकांची यादी: आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी (Nagarparishad Nagarpanchayat Election 2025) ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गीते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, राजन विचारे, आमदार अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, अंबादास दानवे यांचा या यादीत समावेश आहे.

याशिवाय शिवसेना सचिव आदेश बांदेकर, आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, राजकुमार बाफना, खासदार प्रियांका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, मनोज जामसुतकर, नितीन देशमुख, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, जयश्री शेळके, जान्हवी सावंत, शरद कोळी, वैभव नाईक, आनंद दुबे, किरण माने, अशोक तिवारी, प्रियांका जोशी, सचिन साठे, लक्ष्मण वडले यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर- (NCP Star Campaigners List)

राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार , राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, अदिती तटकरे, इंद्रनील नाईक, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे, प्रताप पाटील-चिखलीकर, नवाब मलिक, सयाजी शिंदे, मुश्ताक अंतुले, समीर भुजबळ, अमोल मिटकरी, सना मलिक-शेख, रुपाली चाकणकर, इद्रिस नायकवडी, अनिकेत तटकरे, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन, सिद्धार्थ कांबळे, सुरज चव्हाण, लहू कानडे, कल्याण आखाडे यांसारख्या दिग्गजांचाही समावेश आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान- (Nagarparishad Nagarpanchayat Election 2025)

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहेत. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे आज सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्विकारले जाणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तसंच इच्छुक उमेदवारांना ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन पद्धतीनेसुद्धा उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

राज्यात निवडणूकीच्या धामधूमीत नवीन पक्षाची एंट्री; शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून निर्माण झालेला नॅशनल पीपल्स पार्टी निवडणूक लढवणार

आणखी वाचा

Comments are closed.