दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्याच दिवशी भारताला लोळवलं, नाकावर टिच्चून पहिला कसोटी सामना जिंकला; गंभीरच
कोलकाता पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना फक्त तीन दिवसांतच संपला आणि तोही भारताच्या पराभवाने. कोलकात्याच्या हिरव्यागार ईडन गार्डन्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला लोळवत 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे कोच गौतम गंभीर यांचे चेहरेवरील नाराजी स्पष्टपणे दिसत होती. आता टीम इंडियासमोर मालिकेत परतण्यासाठी दुसऱ्या कसोटीत करो या मरो अशी वेळ येऊन ठेपली आहे. गुवाहाटीत होणार पुढचा सामना भारताला काही करून जिंकावा लागेल.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव : 159 धावांत गुंडाळला
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली, पण हा निर्णय पाहुण्यांना महागात पडला. भारतीय गोलंदाजांनी अथक माऱ्याच्या जोरावर संपूर्ण आफ्रिकन संघाला फक्त 159 धावांत बाद केले. शतक तर दूर, अर्धशतकही कुणाच्या वाट्याला आले नाही. एडन मार्करम 31 धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला. मुल्डर आणि जॉर्जी यांनी प्रत्येकी 24 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. 14 षटकांत 27 धावा देत 5 विकेट्स त्याने घेतल्या. टेस्ट कारकिर्दीत ही त्याची 16वी पाच विकेटची कामगिरी. यातील 13 वेळा त्याने हे SENA देशांविरुद्ध केले आहे, म्हणजेच परिस्थिती कशीही असो, बुमराहचा मारा तिथेही तितकाच प्रभावी असतो.
भारताचा पहिला डाव : सायमन हार्मरचा कहर
दक्षिण आफ्रिकेसारखंच भारताच्या फलंदाजांचीही पहिल्या डावात परिस्थिती बिकट झाली. सलामीवीर के.एल. राहुलने सर्वाधिक 39 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर (29), रवींद्र जाडेजा (27) आणि ऋषभ पंत (27) यांनीही चांगली सुरुवात केली होती, मात्र ती मोठ्या खेळीत रूपांतरित करू शकले नाहीत. कर्णधार शुभमन गिल फक्त 4 धावा करून दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. भारताचा पहिला डाव 189 धावांवर संपला आणि त्यांना 30 धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेसाठी स्पिनर सायमन हार्मरने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर मार्को जान्सेनने 3 विकेट मिळवल्या.
दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव : टेम्बा बावुमाची झुंजार खेळी
दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी तुफानी मारा करत आफ्रिकेचा कणा मोडला. केवळ 91 धावांपर्यंत पोहोचतानाच दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट गमावल्या होत्या. रवींद्र जाडेजाने एडेन मार्करम (4), वियान मुल्डर (11), टोनी डी झोरजी (2) आणि ट्रिस्टन स्टब्स (5) यांना बाद करत आफ्रिकेची डावाची गाडी रुळावरून घसरवली. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनीही जाडेजाला उत्तम साथ दिली.
पण, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याचे कौतुक करावे लागेल. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या तासात त्याने जबरदस्त इंटेंट दाखवत खेळ रोखून धरला. तिसऱ्या दिवशीही त्याने आपली झुंज कायम ठेवली. कॉर्बिन बॉश (25) याच्या सोबतीने आठव्या विकेटसाठी 44 धावांची महत्त्वाची भागीदारी उभी केली. शेवटी, दक्षिण आफ्रिकेची अखेरची दोन विकेट मोहम्मद सिराजने घेतल्या. सायमन हार्मर (7) आणि केशव महाराज (0) यांना स्वस्तात माघारी पाठवले आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 153 धावांवर आटोपला. बावुमाने 136 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 55 धावा करत जिद्दीची खेळी साकारली. भारताकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
भारताचा दुसरा डाव : सगळे दिग्गज फेल
पहिल्या डावातील 30 आघाडीमुळे भारतासमोर विजयासाठी 124 धावांचे लक्ष्य होते. पण धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खुपच खराब झाली, मार्को जानसेने यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद केले.
आणखी वाचा
Comments are closed.