बवुमाचं कधी न पाहिलेलं सेलिब्रेशन, वॉशिंग्टन रडला; द. अफ्रिकेने सामना जिंकताच मैदानात काय घडलं?
भारत विरुद्ध एसए पहिली कसोटी: दक्षिण अफ्रिकेने भारत विरुद्धच्या (India vs South Africa 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात 30 धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच विजय मिळत दक्षिण अफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे तब्बल 15 वर्षांनंतर भारताच्या भूमीवर कसोटी सामना जिंकला आहे. दुसऱ्या डावात भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 31 धावा केल्या. तर दक्षिण अफ्रिकेकडून फिरकीपटू शिमरन हार्मरने सर्वाधिक 4 विकेट्स पटकावल्या.
ईडन गार्डन्सवर झालेल्या रोमहर्षक कसोटीनंतर दक्षिण आफ्रिकेने भारतावर विजय मिळवला 💪📸#WTC27 #INDvSA 📝: https://t.co/fexthP5RGW pic.twitter.com/Zgm96fRp3Q
— ICC (@ICC) 16 नोव्हेंबर 2025
दक्षिण अफ्रिकेने भारताला विजयासाठी 124 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल शून्यावर तर केएल राहुल 1 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था 1 धावांवर 2 विकेट्स अशी झाली. यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांनी भागिदारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु दक्षिण अफ्रिकेचा फिरकीपटू शिमन हार्मरने ध्रुव जुरलला झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. यानंतर रिषभ पंतही 2 धावा करत बाद झाला. रवींद्र जडेजा 18 धावा करत बाद झाला. एकीकडे वॉशिंग्टन सुंदर मैदानात टिकून असताना दुसरीकडे अक्षर पटेलने आक्रमक खेळी करण्यात सुरुवात केली. परंतु अक्षर पटेलही 26 धावांवर झेलबाद झाला. मग वॉशिंग्टन सुंदरनेही 31 धावांवर विकेट गमावली. यानंतर कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज एकापाठोपाठ बाद झाले. मानेला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात आला नाही. त्यामुळे भारताने दुसऱ्या डावात 9 विकेट्स गमावत फक्त 93 धावा केल्या आणि 30 धावांनी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
टेम्बा बावुमाचनचा जोरदार जल्लोष – (दक्षिण आफ्रिकेने भारताचा पहिला कसोटी पराभव केला)
भारताला पराभूत केल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने मैदानात जोरदार सेलिब्रेशन केले. तर दुसरीकडे भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर भावनिक झाला.
भावनिक वॉशिंग्टन सुंदर 💔 pic.twitter.com/lHTn8TqXCN
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 16 नोव्हेंबर 2025
कसोटी कर्णधार म्हणून टेंबा बावुमा:
जिंकला, जिंकला, जिंकला, जिंकला, ड्रॉ, जिंकला, जिंकला, जिंकला, जिंकला, जिंकला, जिंकला, जिंकला, जिंकला 🤯 pic.twitter.com/CsmGdGuH31
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 16 नोव्हेंबर 2025
गेल्या 15 वर्षांत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेने भारतात कसोटी सामना जिंकला- (SOUTH AFRICA WON A TEST MATCH IN INDIA AFTER 15 YEARS)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 30 धावांनी पराभव केला. गेल्या 15 वर्षांत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेने भारतात कसोटी सामना जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतात शेवटचा कसोटी सामना 2010 मध्ये जिंकला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला भारतात एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.